मजुरांमध्ये मतदार जागृती

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : २०७ भोसरी विधानसभा मतदारसंघ अंतर्गत भोसरी मजूर अड्डा याठिकाणी मतदार जनजागृती महाभियान राबविण्यात आले. याप्रसंगी हजार ते बाराशे मजूरांना मतदान करण्याबाबत प्रतिज्ञा देण्यात आली. यात महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग होता.
सदर मतदार अभियान राबविण्यासाठी भूसंपादन उपजिल्हा अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी श्री रेवणनाथ लबडे, तहसीलदार श्री सतीश थेटे, प्रशासन अधिकारी सौ.संगीता बांगर यांचे मार्गदर्शन लाभले. सदर अभियानाप्रसंगी स्वीप अधिकारी श्री संजय धोत्रे यांनी मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून तुमचे मतदान भोसरीत असो किंवा गावी असो, तिथे मतदान करणे ही आपली जबाबदारी आहे या शब्दात मतदान करण्याचे आवाहन करून मतदान प्रतिज्ञा दिली. या प्रसंगी सहा. प्रशासन अधिकारी रजिया खान, भोसरी विभाग निवडणूक पर्यवेक्षक श्री अमोल फुंदे व स्वीप सहा बाळू कस्पटे उपस्थित होते.