फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
मनोरंजन

यंदा पहिल्या दिवशी सर्वाधिक गल्ला `धर्मवीर २` चा

यंदा पहिल्या दिवशी सर्वाधिक गल्ला `धर्मवीर २` चा

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित ‘धर्मवीर २: साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट’ या सिनेमाने पहिल्याच दिवशी रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे. या सिनेाने तब्बल एक कोटींच्यावर बॉक्स ऑफिसवर कलेक्शन असून २०२४ या वर्षात पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा हा मराठी चित्रपट ठरला आहे. मराठी चित्रपटांनी दाक्षिणात्य आणि बॉलिवूडमधल्या लोकप्रिय कलाकारांचा समावेश असणाऱ्या ‘देवरा पार्ट १’सारख्या चित्रपटाला या चित्रपटानं जोरदार टक्कर दिल्याचं बॉक्स ऑफिसवर दिसून येत आहे. पण चौथ्या दिवशी सिनेमाच्या कमाईत घट झाल्याचं दिसून आलं.

या आधीच्या ‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. ‘धर्मवीर’ या चित्रपटानंतर ‘धर्मवीर २’ या चित्रपटात नक्की काय दाखवलं जाणार याची प्रेक्षकांना उत्सुकता होती. त्याचं प्रतिबिंब चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर मिळालेल्या प्रेक्षकांच्या प्रतिसादातून दिसून येत आहे.‘धर्मवीर २’ची घोषणा झाल्यापासूनच चित्रपटाविषयी उत्सुकता होती; त्यामुळंच ‘धर्मवीर’ या पहिल्या भागापेक्षा ‘धर्मवीर २’ या चित्रपटाला रसिकप्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभत असलेला ‘धर्मवीर २’ हा पहिला राजकीय सीक्वेल ठरला आहे.

आठवड्याच्या शेवटापर्यंत या चित्रपटानं तब्बल सात कोटी ९५ लाखांच्या जवळपास कमाई करून दमदार कामगिरी केली आहे. १५०० पेक्षाही अधिक शोजनं या चित्रपटाची सुरुवात करण्यात आली. sacnilk च्या आकड्यांनुसार पहिल्या दिवशी चित्रपटानं १.७५ कोटींची कमाई केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सिनेमाच्या कमाईत मोठी वाढ झाली. सिनेमानं २.३५ कोटींचा गल्ला जमवला. तर तिसऱ्या दिवशी सिनेमानं २.७५ कोटींची कमाई केली. तर सोमवारी म्हणजेच चौथ्या दिवशी सिनेमाच्या कमाईत घट झाल्याचं पाहायला मिळालं. सिनेमानं १.१० कोटींची कमाई केली. या सिनेमानं आतापर्यंत सात कोटी ९५ लाखांच्या जवळपास कमाई केली आहे.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"