फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
देश विदेश

स्वप्नील चिंचवडे आयर्नमॅन

स्वप्नील चिंचवडे आयर्नमॅन

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : इटली येथे झालेल्या आयर्नमॅन स्पर्धेत स्वप्नील चिंचवडे यांनी पिंपरी-चिंचवड शहराचा झेंडा पुन्हा अटकेपार फडकावला. त्यांनी ही स्पर्धा १३ तास २८ मिनिटे व दोन सेकंदात पूर्ण केली.

मागील वर्षी स्पेन (बार्सिलोना) मध्ये झालेल्या स्पर्धेतही त्यांनी यश मिळवले होते. पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी चिंचवड गावातून त्यांची भव्य मिरवणूक काढून त्यांचा भव्य सत्कार केला. इटली येथे २१ सप्टेंबरला झालेल्या या स्पर्धेत जगभरातून २३०० स्पर्धक सहभागी झाले होते. त्यामध्ये भारतातील २० तर महाराष्ट्रातील पाच जण होते. या स्पर्धेत ४२ किलोमीटर धावणे, ३.८ किलोमीटर पोहणे आणि १८० किलोमीटर सायकलिंग असे तीनही प्रकार करावे लागतात. या तीनही प्रकारात ४२ वर्षीय स्वप्निल चिंचवडे यांनी बाजी मारली.

आज सकाळी पिंपरी चिंचवड शहरात ते आले. त्यांच्या यशाने पिंपरी चिंचवड मधील खेळाडूंमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. या यशाचे श्रेय त्यांनी आपले वडील पीसीएमटीचे माजी सभापती सुरेश चिंचवडे यांना देत त्यांच्या प्रोत्साहनामुळेच हे शक्य झाल्याची प्रतिक्रिया आज व्यक्त केली.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"