फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
राजकारण

मी सुरक्षा घेईन पण..

मी सुरक्षा घेईन पण..

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, प्रतिनिधी : शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना केंद्र सरकारकडून देण्यात येणारी सुरक्षा स्वीकारण्यापूर्वी पवार यांनी केंद्र सरकारपुढे काही अटी ठेवली आहे. त्या अटी मान्य झाल्या तरच झेड प्लस सुरक्षा स्वीकारायची की नाही, हा निर्णय घेईन, असे पवार यांनी म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने शरद पवार यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा देऊ केली होती.मात्र, आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारने हा निर्णय घेतला असल्याची टीका पवार यांनी केली होती. मी कुठे जातो, माझे दौरे, कार्यक्रम याची संपूर्ण माहिती ठेवण्यासाठी मोदी सरकारने हे पाऊल उचलल्याचे पावर यांनी म्हटले होते. त्यावर त्यांनी विधान केलं होतं की, मी स्वतः अशा सुरक्षेची मला गरज आहे का किंवा मला कोणता धोका आहे का, हे पडताळून पाहीन आणि मग सुरक्षा स्वीकारेन की नाही, हा निर्णय घेईन. या संदर्भातच शरद पवार यांच्या प्रतिनिधीची केंद्राच्या अधिकाऱ्यांसोबत दिल्लीत बैठक झाली. यावेळी शरद पवारांतर्फे काही अटी ठेवण्यात आल्या आहेत.

कोणत्या अटी ठेवल्या शरद पवार यांनी?

  • स्वतःच्या खाजगी वाहनात सुरक्षा कर्मचाऱ्यांना प्रवेश नसणार
  • केंद्राच्या सुरक्षेआधी राज्याचे सुरक्षा कर्मचारी माझ्यासोबत असणार
  • कार्यालयात आणि निवासस्थानाच्या आत केंद्राच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना प्रवेश नसणार

याशिवाय आणखी काही अटी शर्थींचे पत्र शरद पवारांकडून केंद्राला सादर करण्यात आले आहे. या अटी मान्य केल्यावर पवारांकडून केंद्राची सुरक्षा घेण्याचा विचार केला जाणार आहे.कोणत्या गोष्टींमुळे केंद्रीय गृह खात्याला आपल्या जीवाला धोका निर्माण होईल असे वाटते, त्या सर्व संभाव्य धोकादायक बाबींची यादी पवारांनी गृह खात्याकडे मागितली होती. यापूर्वीही शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षेसाठी विचारणा करण्यात आली होती, तसेच सुरक्षा देण्याचे केंद्राकडून जाहीर करण्यात आले होते, पण शरद पवारांनी सुरक्षा नाकारली होती. शरद पवारांनी ही एक प्रकारची गुप्तहेरगिरी करण्याची पद्धत असल्याचे सांगत केंद्रास नकार दिला होता.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"