मलाइका अरोराच्या वडिलांची आत्महत्या?

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिचे वडील अनिल अरोरा यांचा वांद्रे पश्चिम येथील त्यांच्या सहाव्या मजल्यावरील घराच्या बाल्कनीतून पडून बुधवारी सकाळी साडेदहा वाजता मृत्यू झाला. त्यानंतर अरोरा यांनी आत्महत्या केल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. परंतु अरोरा यांचा मृत्यू म्हणजे आत्महत्याच आहे, याला अद्याप मुंबई पोलिसांनी दुजोरा दिलेला नाही.
सकाळी उठल्यानंतर अनिल अरोरा हे खिडकीजवळ उभे राहून पेपर वाचत होते आणि अचानक पडले. इमारतीतील रहिवाशांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेले, परंतु तिथे दाखल करण्यापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आले. अरोरांच्या घराच्या आजूबाजूच्या परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. मलायकाचे वडील ८० वर्षांचे आहेत. त्यांनी आत्महत्या केली असे गृहीत धरले जात आहे, परंतु खिडकीच्या ग्रीलची उंची खूप कमी असल्याने सहाव्या मजल्यावरून पडून अपघाताने त्यांचा मृत्यू झाल्याचा संशयही पोलिसांनी व्यक्त केला आहे.त्यांच्याजवळ कुठलीही सुसाईड नोट न आढळल्याने गुंता वाढला आहे. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करत पुढील तपास सुरु केला आहे.
नेमकं घडलं काय?
मलायकाची आई जॉयस पोलीकार्प यांनी पोलिसांनी सांगितलं की, बुधवारी सकाळी जेव्हा त्यांनी घराच्या हॉलमध्ये अनिल अरोरा यांची चप्पल पाहिली. त्यानंतर त्यांना पाहण्यासाठी त्या बाल्कनीत गेल्या. पण ते तिथेही नव्हते. बाल्कनीतून खाली पाहिलं अनिल अरोरा खाली पडले होते, वॉचमॅन मदतीसाठी ओरडत होता. गेल्या काही महिन्यांपासून अनिल अरोरा आजारी असल्याच्या चर्चा देखील मलायकाच्या आईने फेटाळल्या आहेत.