फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पुणे

अनुराधा गोरखे यांचा सन्मान

अनुराधा गोरखे यांचा सन्मान

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : पुणे जिल्हा नागरी बँक असोसिएशनच्या वतीने आणि अमनोरा येस फाउंडेशन पुरस्कृत देण्यात येणाऱ्या ‘मीरा देशपांडे उत्कृष्ट योगदान पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन असोसिएशनच्या अरण्येश्वर मधील सभागृहात केले होते. यंदा शहर यासाठी श्री गजानन लोकसेवा सहकारी बँक चिंचवड संचालिका श्रीमती अनुराधा गणपत गोरखे,महेश सहकारी बँकेच्या संचालिका गीता मणियार, राजर्षी शाहू सहकारी बँकेच्या मंगल जाधव, आणि संत सोपानकाका सहकारी बँकेच्या राजवर्धिनी तापकीर यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

ज्येष्ठ बैंकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर या हस्ते पुरस्कार वितरण झाले. ‘बँकेच्या च्या दृष्टीने काही गोष्टी चुकत असल्यास महिला संचालकांनी त्याचा विरोध पाहिजे. संचालक मंडळाच्या बैठकीला उपस्थित होते.

ज्ञानाधिष्ठित सहभाग असावा,’असेमत बैंकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर यांनी व्यक्त केले. या वेळी असोसिएशनचे अध्यक्ष अड. सुभाष मोहिते, सिटी कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे, अमनोरा येस फाउंडेशनचे विवेक कुलकर्णी उपस्थित होते. ४० वर्षे भगिनी निवेदिता सहकारी बँकेच्या संचालिका असणाऱ्या मीरा देशपांडे यांच्या स्मरणार्थ २१०००/- रोख व स्मृतिचिन्ह अशा स्वरूपाचा पुरस्कार देण्यात येतो.

बँकिंग क्षेत्रात महिला संचालकांचे योगदान मोठे आहे; परंतु त्यांना वाव दिला जात नाही. संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये महिलांनी प्रश्न विचारल्यास पुरुषांना त्याचे वावडे असते. एखाद्या अडचणीच्या काळात पुरुष हतबल होतो; परंतु स्त्री ताकदीने उभी राहते. त्यामुळे बँकेच्या अडचणीच्या काळात महिला सक्षमतेने बँकेला पुढे नेऊ शकतात,’ असे अनास्कर म्हणाले. ‘भगिनी निवेदिता बँकेच्या जडणघडणीमध्ये देशपांडे यांचे मोलाचे सहकार्य होते. सिटी कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मीरा देशपांडे यांचे पुत्र अनिरुद्ध देशपांडे यांनी आईच्या स्मरणार्थ पुणे जिल्हा नागरी बँक असोसिएशनकडे ठेव ठेवली असून, त्याच्या व्याजातून पुरस्कार देण्याची तरतूद केली,’ असे मोहिते यांनी सांगितले. विवेक कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"