फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
महाराष्ट्र

पिंपरी-चिंचवडमधील २१ पोलिसांना विशेष सेवा पदक

पिंपरी-चिंचवडमधील २१ पोलिसांना विशेष सेवा पदक

मुंबई, प्रतिनिधी : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पोलिस महासंचालक रश्मि शुक्ला यांनी राज्यातील ११४८ पोलिसांना ‘विशेष सेवा पदक’ जाहीर केले आहे. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील २० अधिकारी आणि एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे. पुणे शहर पोलीस दलातील १२ तर पुणे ग्रामीण पोलीस दलातील पाच जणांना हे पदक जाहीर झाले आहे.

पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील दोन पोलीस निरीक्षक, १८ पोलीस उपनिरीक्षक आणि एक पोलीस कर्मचारी अशा २१ जणांना हे पदक जाहीर झाले आहे. शिरगाव पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तेजस्विनी कदम यांनी नक्षलग्रस्त भागात साडेतीन वर्ष सेवा केली आहे. दरम्यान त्यांना सेवाकाळात १०० पेक्षा अधिक रिवार्ड मिळाले आहेत. त्यामुळे त्यांना ‘विशेष सेवा पदक’ जाहीर झाले आहे. सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी गोंदिया येथे सेवा केली असून त्यांना देखील हे पदक जाहीर झाले आहे.

नक्षलवाद्यांच्या हिंसक व बेकायदेशीर कारवायांना परिणामकारक आळा घालण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना दरवर्षी महासंचालकांकडून ‘विशेष सेवा पदक’ दिले जाते. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला या पदकांची घोषणा केली जाते. तर प्रत्येक घटकनिहाय पदक वितरणाचा समारंभ स्वतंत्रपणे आयोजित केला जातो.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"