फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पिंपरी-चिंचवड

चक्रपाणी वसाहतीत ‘ड्रेनेज लाईन’चे सर्वेक्षण सुरू

चक्रपाणी वसाहतीत ‘ड्रेनेज लाईन’चे सर्वेक्षण सुरू

पिंपरी : भोसरी विधानसभा मतदार संघातील चक्रपाणी वसाहत परिसरातील ‘ड्रेनेज लाईन’चे महानगरपालिका प्रशासनाकडून सर्वेक्षण करण्यात येत आहे. अगामी काळात सांडपाणी निचरा व्यवस्था सक्षम करण्यात येणार आहे. आगामी काळात पाणी साचण्याची समस्या कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

यासंदर्भात आमदार महेश लांडगे म्हणाले की, पिंपरी-चिंचवडसह मावळ परिसरात कमी वेळात मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे भोसरी विधानसभा मतदार संघातील सखल भागांमध्ये पाणी साचले. चक्रपाणी वसाहत आणि परिसरात वाढलेल्या लोकसंख्येच्या तुलनेत ड्रेनेज आणि स्ट्रॉमवॉटर लाईनची क्षमता वाढवणे आवश्यक आहे. त्यासाठी महानगरपालिका प्रशासनाला सूचना केल्या आहेत. आगामी काळात ड्रेनेज तुंबल्यामुळे सर्वसामान्य नागरिक, सोसायटीधारकांना नाहक मनस्ताप होणार नाही. यासाठी सर्वोतोपरी कार्यवाही करण्यात येत आहे.

चक्रपाणी वसाहतीमधील मधुबन कॉलनी १ ते ५, शिवशंभू कॉलनी १ ते ५, मंजुळा कॉलनी अशा कॉलनींमध्ये पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचते. महानगरपालिका प्रशासनाकडून सर्वेक्षणाचे काम पूर्ण करुन आवश्यकता भासल्यास नवीन ड्रेनेज लाईन टाकण्यात येणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुणे, पिंपरी-चिंचवडसह मावळच्या ग्रामीण भागात अतिमुसळधार पावसाने झोडपून काढले. शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचले. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या ठिकाणी ड्रेनेज लाईन, स्ट्रॉम वॉटर लाईनचे काम तातडीने मार्गी लावावे, अशी सूचना आमदार महेश लांडगे यांनी केली होती. त्यानुसार, सदर सर्वेक्षणचे काम सुरू झाले आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"