प्रशस्त रस्ते पण! खासगी वाहनामुळे वाहतुककोंडी

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी: सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या पिंपरी- चिंचवड शहरांमधे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्याने खाजगी वाहन वापरावर भर दिला जात आहे. परिणामी रस्ते प्रशस्त असूनही पिंपरी- चिंचवड शहरातील विविध भागांमध्ये वाहतुकीचीकोंडी होत आहे. त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. वेळ आणि आर्थिक फटकाही बसत आहे.
जागतिक नकाशावर वेगाने विकसित होणारे शहर म्हणजे पिंपरी चिंचवड. पुणे -मुंबई जुना राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूला औद्योगिकनगरी विस्तारली आहे. औद्योगिकनगरी म्हणून लौकिक असणाऱ्या या शहरात देशातून तसेच राज्याच्या विविध भागातून नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने पिंपरी- चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणावर नागरिक आलेले आहेत. पूर्वेला भोसरीपासून चऱ्होलीपर्यंत, पश्चिमेला हिंजवडी पर्यंत, दक्षिणेस दापोडी- सांगवीपर्यंत आणि उत्तरेला देहू- आळंदी रस्त्यापर्यंत शहर विस्तारले आहे. शहराच्या सीमेवर असणाऱ्या हिंजवडी आणि तळवडे आयटी पार्कमुळे शहराचा विकास वेगाने होत आहे. नागरिकरण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. नागरिकरण मोठ्या प्रमाणावर वाढल्याने सोमाटणे फाट्यापर्यंत तसेच चाकणपर्यंत मोठ्या प्रमाणावर रहिवासक्षेत्र वाढले आहे.
कशामुळे आहे, शहरात राहण्यास पसंती!
पुणे आणि लोणावळ्याच्या मधोमध हे शहर आहे. मेट्रो, रेल्वे, एसटी बस, पीएमपी अशी सार्वजनिक वाहतूकव्यवस्था असल्याने या शहरात राहण्यास नागरिक पसंती देत आहेत. बेंगलोर मुंबई महामार्ग पुणे नाशिक महामार्ग आणि पुणे मुंबई महामार्ग असे तीन महामार्ग या शहरातून जातात. त्यामुळे नागरिकरण वाढीचा वेग अधिक आहे. पुणे शहरालगत मात्र, प्रशस्त रस्ते, सुनियोजित शहर म्हणून या शहरात घर घेण्यास नागरिकांची पसंती आहे.
खासगी वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूककोंडीचा प्रश्न गंभीरचा प्रश्न!
पिंपरी- चिंचवड शहरातील दुचाकी चार चाकी वाहनांची संख्या १८ लाखांवर पोहीचली आहे. शहराची लोकसंख्या आहे ३० लाखांवर पोहोचली आहे. दरवर्षी दीड लाख वाहनांची भर पडत आहे. पुणे- मुंबई रेल्वे महामार्ग आणि पिंपरी ते पुणे मेट्रो महामार्ग सोडला तर अंतर्गत भागांमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नाही. परिणामी खाजगी वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे.
हे आहेत वाहतूक कोंडीचे रस्तेसकाळी सात ते नऊ आणि सायंकाळी पाच ते आठ या वेळेत शहरातील अनेक रस्त्यांवर वाहतूककोंडीचा अनुभव येतो. स्वतंत्र पोलीस आयुक्तालय होऊ नही वाहतूककोंडीचा प्रश्न सुटलेला नाही.
१) पुणे मुंबई जुना राष्ट्रीय महामार्गावरील भक्ती शक्ती चौक ते दापोडी पर्यंतच्या ग्रेड सेपरेटर सोडून रस्त्यावर चौकाचौकात वाहतूककोडीचा अनुभव येतो.
२) पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापासून काळेवाडी फाटा. पिंपरी- चिंचवड महापालिका भवनापासून लिंक रोड चिंचवडगाव. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापासून पिंपरीगाव पिंपळे सौदागर सांगवी रस्ता.
३) नाशिक फाटा पिंपळे सौदागर जगताप डेअरी रस्ता. जगताप डेअरी वाकडगाव हिंजवडी रस्ता, नाशिक फाटा भोसरी मोशी चाकण रस्ता.
४) हिंजवडी भुमकर वस्ती थेरगाव रस्ता. निगडी भक्ती शक्ती चौक तळवडे लांडेवाडी रस्ता. पिंपरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते नेहरूनगर भोसरी लांडेवाडी चौक रस्ता. रावेत ते औंध रस्ता. तळवडे चिखली मोशी रस्ता. भोसरी गावठाण ते आळंदी रस्ता.
वाहने दृष्टीक्षेपात
पेट्रोल वाहने -७७ टक्के
डिझेल वाहने -१३ टक्के सीएनजी वाहने -१३ टक्के
इतर वाहने -दोन टक्के
लोकसंख्या :अंदाजे ३०लाख
अंतर्गत मुख्य रस्त्यांची लांबी – ६३४ किलोमीटर
शहरातील एकूण कारखाने – २९७९
रेड ऑरेंज आणि ग्रीन असे कारखाने – १९०२
दरवर्षी नवीन वाहनांची भर – दीड लाख वाहने
शहरातील एकूण वाहने – लाख ५० हजार
सार्वजनिक वाहतूक दळणवळणाची साधने – मेट्रो, रेल्वे, पीएमपी, एसटी बस, खाजगी दुचाकी व चार चाकी वाहने