फक्त मुद्द्याचं!

23rd March 2026
मनोरंजन महाराष्ट्र

पावसाची उघडीप अन् मीम्सचा पाऊस

पावसाची उघडीप अन् मीम्सचा पाऊस

पिंपरी, प्रतिनिधी : पुण्यात मंगळवारी (नऊ जुलै) मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मुलांना सुट्टी जाहीर केली होती. मात्र, पावसाने दडी मारल्याने पुणेकरांनी सोशल मीडियावर मीम चा अक्षरशः पाऊस पाडला आहे. पाऊस व मुलांची सुट्टी या गोष्टी ट्रेडिंग राहिल्या. आता पुढील चार दिवस पावसाचा जोर कमी राहणार असा नवा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

पाऊस आणि शाळेची सुट्टी या मुद्दावर नेटकऱ्यांनी मीमचा अक्षरशः पाऊस पाडला. पावसाचे काही असो पण मुलांची मात्र मज्जा झाल्याचे मत व्यक्त केले आहे. शाळेला सुट्टी दिली तेव्हा कुठे पाऊस थांबला अशी उपरोक्त टिका करण्यात आली. एका नेटकऱ्याने मुलांना पावसाने उल्लु बनाया, तर नाळ मधील बाल कलाकाराचा आता मी येतच नाही हा डायलॉग म्हणणारा पाऊस अशा भन्नाट मीम सोशल मीडियावर पडत होत्या.

याउलट हवामान खात्याने दिलेल्या नवीन अंदाजानुसार, पुढील चार दिवस पावसाचा जोर कमी राहणार आहे. किनारपट्टी सह पश्चिम घाटाच्या परिसरातही जोर कमी राहण्याचा अंदाज आहे. राज्याच्या उर्वरित भागात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.

किनारपट्टीवरील जिल्ह्यांसह पुणे, सातारा, विदर्भ आणि विदर्भाला जोडून असलेल्या मराठवाड्याला पिवळा इशारा दिला आहे. प्रामुख्याने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे.अरबी समुद्रातून बाष्पयुक्त हवा वेगाने किनारपट्टीकडे येत आहे. त्यामुळे किनारपट्टी आणि घाट परिसरात पावसाचा जोर राहील. पण, उर्वरित राज्यात पावसाचा जोर कमी होईल. गुरुवारपर्यंत (११ जुलै) पावसाचा जोर कमी राहील. त्यानंतर पावसाचा जोर हळूहळू वाढण्याचा अंदाज आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"