फक्त मुद्द्याचं!

26th March 2026
आरोग्य

पिंपरीत ओल्या कचऱ्याची यशस्वी विल्हेवाट

पिंपरीत ओल्या कचऱ्याची यशस्वी विल्हेवाट

प्रतिनिधी, पिंपरी – देशभरात प्रत्येक शहरात कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न ऐरणीवर असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या एका प्रकल्पात वर्षभरात सुमारे दोन लाख किलो ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे. मदरसन ग्रुपच्या उपक्रमांतर्गत इंडियन पोल्युशन कंट्रोल यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

मदरसन ग्रुपच्या कार्पोरट सोशल रिस्पॉन्सिबिलीटी उपक्रमांतर्गत इंडियन पोल्युशन कंट्रोल असोसिएशनद्वारे पिंपरी-चिंचवड महापालिकेने एक फेब्रुवारी २०२३ रोजी प्रकल्प राबविण्यास सुरवात केली. त्यानंतर मार्च २०२४ पर्यंत सुमारे दोन लाख किलो ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली. त्यातून २९ हजार किलो कंपोस्ट खत तयार करण्यात आले. एक लाख ४३ हजार ५३६ किलो कार्बन डायऑक्साइड समतुल्य हरितगृह वायू उत्सर्जन कमी झाले. पर्यावरण संवेदनशीलतेच्या अनुषंगाने रहाटणीतील कोकणे चौकात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ही माहिती देण्यात आली. या उपक्रमाचा ८० हजारांहून अधिक रहिवाशांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम झाल्याचा दावा संस्थेनं केला आहे.

या उपक्रमाद्वारे केवळ पर्यावरण संरक्षण झाले नाही तर भूमिगत कचरा रोखण्यास मदत झाली. पर्यावरणविषयक जागरूकता आणि सक्षमीकरणाला प्रोत्साहन मिळाले आहे, अशी माहिती असोसिएशनचे सचिव अजय गर्ग यांनी दिली आहे. कचरा व्यवस्थापन पद्धतीत क्रांती घडवून आणण्यासाठी प्रकल्प महत्त्वाचा ठरला असून, स्थानिक संस्था आणि सक्रिय समुदाय सहभागासह धोरणात्मक भागीदारीद्वारे कचरा विलगीकरण आणि स्त्रोतावर पुनर्वापर करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्नांचा पाया घातला असे संस्थेच्या उपसंचालक डॉ. राधा गोयल यांनी नमूद केले. त्यांनी कचरा व्यवस्थापन उपक्रमांमध्ये एकत्रित कृतीचे महत्त्व देखील यावेळी स्पष्ट करून सांगितले.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"