Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

26th October 2026
गुन्हेगारी

वाहतूक पोलिसाला ट्रकची पाठीमागून धडक; पायाला फ्रॅक्चर!

वाहतूक पोलिसाला ट्रकची पाठीमागून धडक; पायाला फ्रॅक्चर!

पिंपरी : वाहतूक पोलीस कर्मचारी कर्तव्यावर असताना ट्रकने पाठीमागून धडक देऊन त्यांचा डाव्या पायाच्या टाचेला व घोट्याला गंभीर दुखापत केली. ही घटना गुरुवार 8 ऑक्टोबर रोजी सकाळी सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास कृष्णा चौक बाबदेव महाराज उड्डाणपुलाखाली, मावळा पुतळा समोर, किवळे येथे घडली.

याप्रकरणी विजय भीमराव जगताप पोलीस शिपाई, देहूरोड वाहतूक विभाग पिंपरी चिंचवड यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लक्ष्मण शिवाजी ताकभाते (वय 42, सध्या रा. बालाजी मोटे यांच्या घरी भाड्याने, स्वामी समर्थ कमानी जवळ, गल्ली नंबर एक गोकुळ नगर, कात्रज, मूळ- रा. पो. देगाव, ता. मोहोळ, जि. सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या ट्रकचालकाचे नाव आहे.

viara vcc
viara vcc

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी वाहतूक नियमन कर्तव्य करीत असताना टाटा कंपनीचा ट्रक क्रमांक एम एच बारा व्ही एफ 15 53 वरील चालक आरोपी येणे त्याच्या ताब्यातील ट्रक भरधाव वेगाने जबाबदारपणे चालवून वाहतूक नियमन कर्तव्यावर हजर असणारे दत्तात्रय शेंडे पोलीस हवालदार यांना कृष्णा हॉटेल कडून मुकाई चौक बस स्टॉप कडे जात असताना मागून येऊन धडक देऊन रस्त्यावर पाडून त्यांच्या ताब्यातील ट्रकचे मागील बाजूचे उजवीकडील चाक त्यांच्या डाव्या पायावरून चालवून फॅक्चर करून गंभीर दुखापत केली. देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे हे तपास करीत आहे.

indra dairy
indra dairy

बांधकाम साइटवर काम करताना कामगाराचा मृत्यू;दोघांवर गुन्हा दाखल!
पिंपरी : समर्थ कॅरीना सोसायटी थेरगाव येथील बिल्डिंग वर काम करीत असताना कामगाराला कोणतेही सेप्टी साहित्य न पुरवता कामगाराकडून काम करून घेताना कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना 2 ऑक्टोबर रोजी साडेपाच वाजण्याच्या सुमारास समर्थ कॅरेना सोसायटी, थेरगाव येथे घडली. नितीन काळे असे मृत्यू झलेल्या कामगाराचे नाव आहे.

या प्रकरणी एका महिलेने फिर्याद दिली आहे. संतोष सिंग पुजारी (रा. गुरुद्वारा चौक, वाल्हेकरवाडी, आकुर्डी), कैलास विलास मस्के (रा. अशोका सोसायटी, घर नंबर 9, मुसळे दवाखान्याजवळ, काळेवाडी फाटा, थेरगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचे पती नितीन काळे हे समर्थ कॅरेना सोसायटी थेरगाव येथील बिल्डिंग वर काम करीत असताना त्यांना कोणतेही सुरक्षा साहित्य न पुरवता व उपाययोजनांचे कोणतेही साधन न दिल्याने काळे यांचा मृत्यू झाला. पतीच्या मृत्यूस आरोपी जबाबदार असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. काळेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मुजावर हे तपास करीत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"