Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

27th October 2026
पुणे

महाराष्ट्र राज्य पोलीस ‘कर्तव्य मेळावा ; उपस्पर्धांचे निकाल जाहीर!

महाराष्ट्र राज्य पोलीस ‘कर्तव्य मेळावा ; उपस्पर्धांचे निकाल जाहीर!

पुणे : 21 वा महाराष्ट्र राज्य पोलीस ‘कर्तव्य मेळावा’- 2026 मधील स्पर्धांपैकी उपस्पर्धांचे निकाल जाहीर झाले असून यामध्ये खाली स्पर्धक विजयी झाले आहेत. कर्तव्य मेळाव्यातील स्पर्धा निकोप व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील अनुभवी व निष्णांत पंच नेमण्यात आलेले आहे. स्पर्धेतील उपस्पर्धांचे पर्यवेक्षण वरिष्ठ पोलीस अधिकारी करीत आहेत.

viara vcc
viara vcc
indra dairy
indra dairy

स्पर्धेतील विजेते स्पर्धक खालील प्रमाणे
माहिती तंत्रज्ञान नैपुण्य स्पर्धा- संगणकातील मूलभूत तत्वे आणि नवीनतम ट्रेड IT Proficiency Competition (-Objective Test (Fundamentales & Latest Trends in Computer)
सुवर्णपदक– अमोल कोकरे सहायक पोलीस फौजदार, बिनतारी संदेश विभाग पुणे, रजत पदक -राजेश कंचे पोलीस हवालदार, नांदेड परिक्षेत्र, कास्यपदक– संदीप राणे सहाय्यक पोलीस फौजदार, मीरा-भाईंदर वसई विरार

तोडफोड-विरोधी तपासणी स्पर्धा: ३-टी जमिनीवरील शोध मोहीम (Anti Sabotage Check Competition 3T Ground Search)
सुवर्णपदक -आशिष बाळकृष्ण पाटील पोलीस नाईक, महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी, रजतपदक – सतीश बाळकृष्ण गायकवाड पोलीस नाईक, महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी, कांस्यपदक – पंकज हुळके पोलीस हवालदार, गडचिरोली परिक्षेत्र,

पोलीस छायाचित्रण ( Police Photography)
सुवर्णपदक– ए ए गमरे, पोलीस हवालदार, कोकणपरिषेत्र, रजत पदक– तुलसीदास पहारे पोलीस शिपाई, दहशतवाद विरोधी पथक, कास्यपदक- सचिन सोपान चव्हाण पोलीस शिपाई, ठाणे शहर.

विजेत्या स्पर्धकांचा सन्मान गुरुवार आठ ऑक्टोबर रोजी राज्य राखीव बल गट क्रमांक दोन येथे दत्तात्रय शिंदे विशेष पोलीस महानिरीक्षक, राज्य गुन्हे अभिलेख केंद्र, पुणे यांच्या हस्ते व विवेक पाटील पोलीस अधीक्षक पुणे व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"