Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

28th October 2026
गुन्हेगारी

शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याने मारहाण!

शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याने मारहाण!

पिंपरी : मुलीला शिवीगाळ केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिला आणि त्यांच्या आईला मारहाण करण्यात आली. यावेळी एका महिलेच्या डोक्यात वीट मारून तिला गंभीर जखमी करण्यात आले. मिलिंद नगर पिंपरी येथे रविवार 4 ऑक्टोबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली.

viara vcc
viara vcc

याप्रकरणी महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वैशाली डुकरे (वय 40), तुषार डुकरे (वय 30, दोघेही रा. मिलिंद नगर, पिंपरी) आणि तुषारच्या एका मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

indra dairy
indra dairy

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीच्या आईने वैशाली डुकरे यांना त्यांच्या नातवाने फिर्यादीच्या मुलीला शिवीगाळ केल्याबाबत जाब विचारला. त्याचा राग आल्याने आरोपींनी फिर्यादी आणि त्याच्या आईला शिवीगाळ व मारहाण केली. तुषार यांनी रस्त्यावरील वीट उचलून फिर्यादीच्या डोक्यात मारल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

जुन्या भांडणाच्या वादातून तरुणावर हल्ला!
पिंपरी : जुन्या भांडणाबाबत चर्चा करण्यासाठी बारमध्ये बोलावून तरुणावर काटा- चमच्याने हल्ला करण्यात आला. इंद्रायणी नगर भोसरी येथे रविवार 4 ऑक्टोबर रोजी सायंकाळी चारच्या सुमारास ही घटना घडली

साहिल समशेर शेख (वय 20, रा. भोसरी) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बाबासाहेब काळूराम जाधव (वय 30, रा. बालाजी नगर, झोपडपट्टी, भोसरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने जुन्या भांडणाबाबत बोलण्यासाठी शेख यांना बारमध्ये बोलावले होते. तेथे दारू पीत असताना दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. आरोपीने हॉटेलमधील काटा चमच्याने शेख यांच्या नाकावर आणि डाव्या गालावर मारून जखमी केले. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"