Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

28th October 2026
पिंपरी-चिंचवड

‘ड’ क्षेत्रीय कार्यक्षेत्रातील पिंपळे गुरव येथील अनधिकृत बांधकामांवर कारवाई!

‘ड’ क्षेत्रीय कार्यक्षेत्रातील पिंपळे गुरव येथील अनधिकृत बांधकामांवर कारवाई!

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत बांधकामांवर सातत्याने कारवाई करण्यात येत असून, ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील पिंपळे गुरव, प्रभाग क्रमांक २९ येथे अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली. प्रभात नगर येथील सुमारे ४३२ चौ.मी. क्षेत्रफळाच्या आर.सी.सी. अनधिकृत बांधकामावर महापालिकेच्या पथकाने कारवाई केली.

viara vcc
viara vcc

महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार तसेच अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर आणि उपायुक्त अतुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

indra dairy
indra dairy

सहायक आयुक्त तथा क्षेत्रीय अधिकारी अश्विनी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत महानगरपालिका धडक कारवाई पथकाने ही कारवाई केली. या कारवाईमध्ये बीट निरीक्षक विकास वारभुवन, सचिन फडतरे, रूपक शिनगारे आणि शिवानी भगत यांच्यासह ५ मजूर, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे १५ जवान आणि ३ पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.

कारवाईसाठी १ जॉ क्रशर, २ जेसीबी आणि १ ट्रॅक्टर ब्रेकर या यंत्रसामग्रीचा वापर करण्यात आला. आवश्यक पोलीस बंदोबस्त आणि सुरक्षा व्यवस्थेत ही कारवाई करण्यात आली.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"