Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

27th October 2026
गुन्हेगारी

वृद्ध दांपत्याला भरधाव कारची धडक महिलेचा मृत्यू!

वृद्ध दांपत्याला भरधाव कारची धडक महिलेचा मृत्यू!

पिंपरी : रस्ता ओलांडणाऱ्या वृद्ध दांपत्याला भरधाव कारणे धडक दिली. या धडकेत गंभीर जखमी झालेल्या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. ही घटना रविवार 4 ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास जुना उर्फे टोल नाक्याजवळ घडली. मंगल ईश्वर पाटील (रा सांगली) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

viara vcc
viara vcc

प्रथम शशिकांत भोर (वय 22, रा. मुंबई) या कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचे आजोबा आणि आजी जुना उर्से टोल नाका येथे उतरले होते. ते वडगावच्या दिशेने रस्ता ओलांडत असताना पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या मारुती ब्रेझा कारने (एमएच 01/ डीई /23 22) त्यांना धडक दिली. या अपघातात मंगल पाटील गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.

indra dairy
indra dairy

नेहरूनगर येथे फरशी डोक्यात घालून खून!
पिंपरी : नेहरूनगर येथे पदपथावरून जात असलेल्या वृद्धाच्या डोक्यात सिमेंटची फरशी मारून त्यांचा खून करण्यात आला. ही घटना रविवार 4 ऑक्टोबर रोजी पहाटे दीडच्या सुमारास संतोषी माता चौक ते झिरो बॉईज चौकादरम्यान घडली. प्रभाकर कुंडलिक सरकटे (वय 50) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

या प्रकरणी त्यांचा मुलगा गणेश प्रभाकर सरकटे (वय 24, रा. नेहरुनगर, पिंपरी) यांनी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रोहित उर्फ भाऊ जांग्या प्रकाश धोत्रे (रा. नेहरूनगर, पिंपरी), प्रणित प्रशांत निकाळजे (वय 19, रा. नेहरूनगर, पिंपरी), सचिन राम साबळे (वय 29) यांच्यासह अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रभाकर सरकटे हे पदपथावरून जात असताना आरोपींनी अज्ञात कारणावरून त्यांना गाठले. त्यानंतर त्यांच्या डोक्यात सिमेंटची फरशी मारून गंभीर जखमी केले. या हल्ल्यात सरकटे यांचा मृत्यू झाला. संत तुकाराम नगर पोलीस तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"