धक्का लागल्याच्या वादातून तरुणांच्या डोक्यात फोडली बाटली!

पिंपरी : हॉटेलमध्ये धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून चौघांनी एका तरुणाला लाथा बुक्क्यांनी मारहाण करून त्याच्या डोक्यात बिअरची बाटली फोडली. ही घटना शनिवार ३ ऑक्टोबर रोजी रात्री पावणे अकराच्या सुमारास चिखली येथील हॉटेल सरपंच मळा येथे घडली.
याप्रकरणी आदित्य भगवान कळमकर (वय 28, रा. चिखली गावठाण) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चार अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आदित्य आणि त्यांचा मित्र जेवणासाठी हॉटेलमध्ये गेले होते. त्यावेळी एका आरोपीचा आदित्य यांना धक्का लागला

त्यावरून शाब्दिक वाचाबाची झाली. आरोपींनी आदित्य यांना शिवीगाळ व मारहाण करून त्याच्या तोंडावर दगड फेकून मारला. आदित्य हॉटेल बाहेर आल्यानंतरही आरोपींनी त्यांचा पाठलाग करून पुन्हा मारहाण केली. त्यातील एकाने त्याच्या डोक्यात बियरची बाटली मारली. तर इतरांनी दगड फेकून त्यांना जखमी केले. चिखली पोलीस तपास करीत आहेत. धक्का लागल्याच्या वादातून तरुणांच्या डोक्यात फोडली बाटली!

कामगाराने 29 हजार रुपयांची शोल्डर वायर चोरली!
पिंपरी : कंपनीतील कामगाराने 29 हजार रुपये किंमतीचे शोल्डर वायरचे आठ बंडल बॅगेत भरून चोरले. सुरक्षारक्षकांच्या हा प्रकार लक्षात आल्याने त्यांनी पाठलाग करून कामगाराला पकडले. ही घटना रविवार 4 ऑक्टोबर सकाळी साडेसहाच्या सुमारास महाळुंगे येथील फ्लॅश इलेक्ट्रॉनिक कंपनीत घडली.
याप्रकरणी आशिष रामचंद्र त्रिभुवन (वय 54, रा. तळेगाव दाभाडे, मावळ) यांनी दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विवेक खनेलाल पासवान (वय 24, रा. कडाचीवाडी, ता.
खेड, मूळ- गोरखपुर, उत्तर प्रदेश) याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हा संबंधित कंपनीत कामगार असून त्याने कंपनीच्या परवानगीशिवाय स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी 29 हजार रुपये किंमतीचे शोल्डर वायरचे आठ बंडल बॅगेत भरले, ते घेऊन तो निघून जात असताना कंपनीच्या सुरक्षारक्षकांच्या निदर्शनास हा प्रकार आला. सुरक्षारक्षकांनी पाठलाग करून त्याला मुद्देमाला सह पकडले. दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.

