Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

5th October 2026
गुन्हेगारी

ऊस तोडीच्या पैशाच्या वादातून अपहरण; आठ जणांना अटक!

ऊस तोडीच्या पैशाच्या वादातून अपहरण; आठ जणांना अटक!

उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याची कामगिरी
पिंपरी : ऊस टोळीचे उचल पैसे घेऊन आल्याने एका व्यक्तीला घाटे वस्ती, आंबेठाण येथून तीन रिक्षांमधून येऊन आठ जणांनी अपहरण केले. ही घटना तीन ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घाटे वस्ती आंबेठाण येथे घडली. या प्रकरणी सुषमा राजेस चव्हाण (वय 30 ) यांनी उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली आहे.

viara vcc
viara vcc

उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात येथील तपास पथकाने घटनास्थळी व आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही व तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा शोध घेतला. अमोल रामराव राठोड (वय 29, खराबवाडी, स्टार सिटी जवळ, सोपान गीता सोसायटी, रूम नंबर 312, ता. खेड, मूळ- रा. दिंडाळा, ता. उमरखेड, जि. यवतमाळ), सचिन रामराव राठोड (वय 25, रा. खराबवाडी, सारा सिटी सी-1 रूम नंबर 202, ता. खेड, मूळ- रा. दिंडाळा, ता. उमरखेड, जि. यवतमाळ), निलेश संतोष राठोड (वय 27, रा. खराबवाडी, सारा सिटी जवळ ऐश्वर्या बिल्डिंग, रूम नंबर 108, ता. खेड, मूळ- रा.दिंडाळा, ता. उमरखेड, जि. यवतमाळ) या आरोपींना शिक्रापूर येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल तपास केला.

indra dairy
indra dairy

तपासात संदीप गुलाब राठोड (रा. यवतमाळ) यांचे ऊस तोडीचे उचल पैसे फिर्यादी यांचे पती राजेस चव्हाण हा घेऊन आल्याने एकूण आठ जणांनी मिळून केला होता. यामध्ये आरोपींनी राजेस चव्हाण यास घाटेवस्ती, आंबेठाण येथून तीन रिक्षांमधून अपहरण करून राजेस चव्हाण यास त्यांचे मोटरसायकल सह घेऊन गेले होते. उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे, तपास पथकाने तात्काळ दिंडाळा, ता. उमरखेड, जि. यवतमाळ येथे अपहरण करणारे उर्वरित आरोपी इसमांना ताब्यात घेत अपहरण व्यक्ती राजेश बाळू चव्हाण याची 24 तासाच्या आत सुखरूप सुटका केली.

अन्य पाच आरोपींमध्ये शुभम प्रल्हाद जाधव (वय 25, रा. दिंडाळा, ता. उमरखेड, जि. यवतमाळ ),संदीप गुलाब राठोड (वय 42, रा.जिंदाळा, ता, उमरखेड, जि. यवतमाळ), इंदल दावरा जाधव वय 40, रा.दिंडाळा, ता. उमरखेड, जि. यवतमाळ), राजू बापूराव चव्हाण (वय 44, रा. वरुड बेबी, ता. उमरखेड, जि. यवतमाळ), संदीप उदयभान जाधव (वय 32, रा. नाईकनगर तांडा, ता. हदगाव, जि. संभाजीनगर)
अटक आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली हुंदाई वेन्नू कार, तीन ऑटो रिक्षा व अपहरण व्यक्तीची साईन मोटरसायकल इत्यादी मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे हे करत आहेत.

सदरची कारवाई पोलीस उपायुक्त श्रीमती श्वेता खेडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती प्रिया डमाळे, पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे, सहाय्यक पोलीस फौजदार यदु आढारी, पोलीस हवालदार विठ्ठल वडेकर, अनिल गोरड, भैरोबा यादव, संतोष काळे, बापूराव सोनपसारे, गणेश गायकवाड, मंगेश कदम, संतोष वायकर, हरि रणदिवे, शुभम खंडागळे, मंगेश घोलप, साहिल सांडभारे, समीर महात यांनी केली.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"