देवीला चढवलेला सोन्याचा हार चोरी करणाऱ्या मोलकरणीला अटक!

पिंपरी : गौरी- गणपती सणउत्सवाचे वेळी घरातील देवीला घातलेले 30.546 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र पेंडलसह चोरी करणाऱ्या मोलकरणी कडून ताब्यात घेण्यात आले. या घटनेबाबत 26 सप्टेंबर 2026 रोजी शिरगाव- परंदवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

फिर्यादी यांचे घरात काम करणारी महिला गजरा सातपा कांबळे (वय 45, रा. जिजामाता चौकाजवळ, आकुर्डी रेल्वे स्टेशन जवळ) या महिलेस अटक करण्यात आली आहे. अशी माहिती पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 च्या श्वेता खेडकर यांनी दिली आहे.

शिरगाव- परंदवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांचे मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे प्रगटीकरण पथकाने तातडीने फिर्यादी यांचे घरी घरकामास असलेल्या महिलेकडे गुन्ह्याचे अनुषंगाने कौशल्यपूर्ण रीतीने तपास करून व तिच्या मानसिकतेचा अचूक अंदाज घेतला. सदर महिलेने गुन्हा केल्याचे कबूल केला आहे. सदर महिलेस अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिला पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्ह्याच्या तपासा दरम्यान महिला आरोपीने चोरी केलेला 30.546 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र पेंडलसह एकूण दोन लाख 84 हजार 847 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. शिरगाव- परंदवडी पोलीस ठाण्याचे पोलीस तपास करत आहेत.
गुन्ह्याचा तपास पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 श्रीमती श्वेता खेडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त देहूरोड विभाग प्रवीण मोरे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पारखे, पोलीस हवालदार किशोर गिरीगोसावी, सचिन काचोळे, पोलिस अंमलदार प्रसाद जंगीलवाड, दिलीप राठोड, सागर कोळी यांचे पथकाने केला आहे.

