Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

2nd October 2026
गुन्हेगारी

क्रिप्टो करन्सी मध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष. 8 लाख 15 हजार रुपयांची फसवणूक!

क्रिप्टो करन्सी मध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष. 8 लाख 15 हजार रुपयांची फसवणूक!

पिंपरी : क्रिप्टो करन्सी मध्ये पैसे गुंतवल्यास दुप्पट पैसे मिळतील असे अमिष दाखवून दोन व्यक्तींनी फिर्यादी आणि त्यांचे साथीदार यांची आठ लाख पंधरा हजार नऊशे सहा रुपयांची फसवणूक केली. ही घटना एप्रिल 2026 भुमकर चौक, वाकड येथे फिर्यादी यांच्या राहते घरी घडली.

या प्रकरणी एका 23 वर्षीय महिलेने (रा. बिल्डिंग नंबर 43, भगवान नगर, भुमकर चौक वाकड) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुनील राठोड (वय 37) व एक महिला (वय 32, दोघेही रा. दत्तवाडी, नेरे, ता. मुळशी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

viara vcc
viara vcc

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी क्रमांक एक व दोन यांनी फिर्यादीस क्रिप्टो करन्सी मध्ये पैसे गुंतविल्यास दुप्पट पैसे मिळतील असे आश्वासन देऊन फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. फिर्यादी कडून 14 एप्रिल 2026 ते 18 मे 2026 दरम्यान एकूण दोन लाख 73 हजार 482 रुपये तसेच फिर्यादी यांच्या परिचयाचे भागवत तुळशीराम घोडके व कु अभिषेक भागवत घोडके यांचे 5 लाख 42 हजार 424 अशी एकूण आठ लाख पंधरा हजार नऊशे सहा रुपये रक्कम वैयक्तिक अकाउंटवर व स्कॅनरवर ऑनलाइन स्वरूपात घेऊन आर्थिक फसवणूक केली. हिंजवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार हे तपास करत आहेत.

indra dairy
indra dairy

दोन लाख 57 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरला!
पिंपरी : बेकायदेशीरपणे घरात प्रवेश करून फिर्यादीच्या कपाटातून रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा दोन लाख 57 हजार 656 रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना 25 सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास फ्लॅट नंबर 12, शिवम बिल्डिंग, सेंट्रल एक्साईज कॉलनी, सेक्टर नंबर 28, प्राधिकरण येथे घडली.

या प्रकरणी विनोद मल्लाप्पा नेवडे (वय 28, फ्लॅट नंबर 12, शिवम बिल्डिंग, सेंट्रल एक्साईज कॉलनी, प्राधिकरण) यांनी फिर्याद दिली आहे. रोहित रमेश पाटील (वय 35, रा. चिंतामणी चौक, चिंचवड) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीच्या राहते घरी फिर्यादीचे दाजी आरोपी यांनी घरात प्रवेश करून फिर्यादीच्या कपाटातून रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण दोन लाख 57 हजार 656 रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बनसोडे, पोलीस निरीक्षक गोंधे हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"