Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

3rd October 2026
पिंपरी-चिंचवड

कुलकर्णी, आल्हाट यांचा दोषारोपपत्रावरील खुलासा प्रशासनाने फेटाळला!

कुलकर्णी, आल्हाट यांचा दोषारोपपत्रावरील खुलासा प्रशासनाने फेटाळला!
viara vcc
viara vcc

मोशी कचरा दुर्घटना प्रकरण
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मोशी येथील कचरा डेपोतील वेस्ट एनर्जी प्रकल्पातील दुर्घटनेस जबाबदार धरून पर्यावरण अभियांत्रिकी विभागाचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांनी दोषारोपपत्रावरील खुलासा केला आहे. तो फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे त्यांची विभागीय चौकशी केली जाणार आहे.

indra dairy
indra dairy

मोशी येथील कचरा डेपोतील वेस्ट एनर्जी प्रकल्पातील अनधिकृत प्रशासकीय इमारत कोसळून नऊ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. अनेक कर्मचारी जखमी झाले. आठ जुलैला झालेल्या दुर्घटनेस जबाबदार धरून या संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. कर्तव्यात गंभीर निष्काळजीपणा, अक्षम्य हलगर्जीपणा, अधिकारांचा गैरवापर करून अनधिकृत बांधकामास दिलेले प्रशासकीय अभय, पर्यावरणीय नियमांचे केलेले उल्लंघन आणि निष्पाप कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याने मुख्य अभियंता कुलकर्णी यांचे 13 जुलैला सेवा निलंबन करण्यात आले. कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांचेही निलंबन केले गेले.

त्यांच्यावर महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. त्यावर त्यांच्याकडून प्राप्त झालेला खुलासा समाधानकारक नसल्याने फेटाळण्यात आला आहे. या दोन अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी सुरू केली जाणार आहे. आयुक्तांच्या मान्यतेने ती कार्यवाही केली जाणार आहे. ही विभागीय चौकशी किमान सहा महिने चालणार आहे. त्यात दोषी आढळल्यास त्या दोन्ही अधिकाऱ्यांवर नियमानुसार कारवाई केली जाऊ शकते. दुर्घटने प्रकरणी महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे अधिकारी ऋषिकांत चिपाडे यांचेही निलंबन करण्यात आले आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"