Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

3rd October 2026
गुन्हेगारी

सोन्या चांदीचे दागिने विकू नये म्हणून पत्नीने घरातच लपवून ठेवले 14 लाखाचे दागिने!

सोन्या चांदीचे दागिने विकू नये म्हणून पत्नीने घरातच लपवून ठेवले 14 लाखाचे दागिने!

गुन्हे शाखा युनिट (तीन) ने बारा तासातच लावला चोरीचा छडा
पिंपरी : सोन्या चांदीचे दागिने विकून नवीन घर खरेदी करू नये म्हणून पत्नीने ते घरातच लपवून ठेवून दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. गुन्हे शाखा युनिट (तीन) ने 13 लाख 98 हजार 978 रुपये किंमतीचे दागिने हस्तगत करुन बारा तासातच चोरीचा छडा लावला आहे. ही घटना शनिवार 26 सप्टेंबर रोजी दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

viara vcc
viara vcc

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा समांतरपणे करत होती. गुन्ह्याच्या तपासादरम्यान घटनास्थळाच्या आजूबाजूचे उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज तसेच संबंधित मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. संबंधित बिल्डिंगमध्ये बाहेरील कोणी आले किंवा गेल्याचे निष्पन्न होत नसल्याने शेजारी राहणाऱ्या रहिवाशांना विश्वासात घेऊन विचारपूस केली. तरीही काहीही पुरावा उपलब्ध होत नव्हता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे व पोलीस हवालदार युवराज बिराजदार यांनी फिर्यादीच्या पत्नीला विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली.

indra dairy
indra dairy

चौकस बुद्धी, बारकाईने निरीक्षण करण्याची क्षमता उपलब्ध होत असलेल्या छोट्या छोट्या पुराव्याचा आणि घटनाक्रमांचा सखोल अभ्यास करून त्यातील महत्त्वाचे धागेदोरे हेरले. तर्कशुद्ध विचारसरणी आणि गुन्हेगारांच्या मानसिकतेचा अचूक अंदाज घेत तपासादरम्यान फिर्यादीच्या पत्नीने आपले सोने विकले जाऊ नये या भीतीने दागिने लपवून ठेवल्याचे सांगितले. घरात लपून ठेवलेले त्यांचे सोन्या चांदीचे दागिने पंचासमक्ष काढून दिल्याने ते जप्त केले. असून सदर गुन्हा उघडकीस आणला . सदर गुन्ह्याचा तपास दिघी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक वरे करीत आहेत.

पोलीस उपायुक्त गुन्हे रोहिदास पवार, सहा पोलीस आयुक्त गुन्हे डॉक्टर सुदर्शन राठोड यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे (तीन) संतोष कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील जावळे, पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी, पोलिस अंमलदार युवराज बिराजदार, शशिकांत नांगरे, दिलीप राठोड, नितीन गुंजाळ, निखिल फापाळे, स्वप्निल महाले यांच्या पथकाने केली.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"