Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

3rd October 2026
गुन्हेगारी

गोल्ड लोन ऑफिसरने केला 35 लाख 77 हजार रुपयांचा घोटाळा!

गोल्ड लोन ऑफिसरने केला 35 लाख 77 हजार रुपयांचा घोटाळा!

पिंपरी : फायनान्स मध्ये गोल्ड लोन ऑफिसर या पदावर काम करताना ग्राहकांच्या गोल्ड लोन खात्यामध्ये ग्राहकाकडून कर्ज खाते बंद करण्यासाठी आवश्यक रक्कम रोख स्वरूपात स्वीकारली. मात्र ती 35 लाख 77 हजार रुपये रक्कम कंपनीकडे जमा न करता फसवणूक केली. ही घटना 4 मे 2023 ते 7 फेब्रुवारी 2026 या कालावधीत उन्नती फिनसर्व प्रा लिमिटेड फायनान्स भोसरी शाखा येथे घडली.

viara vcc
viara vcc

या प्रकरणी सुयोग संजय गायकवाड (वय 30,रा. बी/104 ,शिवशंकर अपार्टमेंट, सेक्टर 34, कामोठे, नवी मुंबई) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अक्षय धर्मराज महामुलकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

indra dairy
indra dairy

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हे फिनसर्व प्रायव्हेट लिमिटेड भोसरी या फायनान्स मध्ये गोल्ड लोन ऑफिसर या पदावर 4 मे 2023 ते 7 फेब्रुवारी 2026 या कालावधीत काम करत होते. त्यांनी ग्राहकांच्या गोल्ड लोन खात्यामध्ये संबंधित ग्राहकाकडून कर्ज खाते बंद करण्यासाठी आवश्यक रक्कम रोख स्वरूपात स्वीकारली. मात्र सदर रक्कम कंपनीकडे जमा करणे आवश्यक असतानाही त्यांनी ती रक्कम स्वतःचे आर्थिक फायद्या करिता वापरली असून ग्राहकांच्या व्यवहारांमध्ये कंपनीचे 35 लाख 77 हजार 135 रुपये इतके आर्थिक नुकसान केले आहे. आरोपी हा फिर्यादी यांच्या कंपनीत नोकरीस असूनही त्यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करून कंपनीचा विश्वासघात केला. कंपनीची आर्थिक फसवणूक केल्याचे निदर्शनास आले आहे. भोसरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक टापरे हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"