तडीपार आदेशाचे उल्लंघन व प्रतिबंधित शस्त्र जवळ बाळगल्याने अटक!

पिंपरी : तडीपार आदेशाचे उल्लंघन करून प्रतिबंधित शस्त्र जवळ बाळगले. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये प्रवेश केल्याने एका तरुण गुन्हेगारास अटक करण्यात आली आहे. ही कारवाई गुरुवार 17 सप्टेंबर रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास नेहरूनगर आंबेडकर चौकाकडे जाणाऱ्या सार्वजनिक रोडच्या पादचारी मार्गावर, महात्मा फुले उद्यानाच्या भिंती लगत, आंबेडकर चौकाजवळ, पिंपरी येथे करण्यात आली.

याप्रकरणी महेंद्र गजेंद्र जावळे पोलीस हवालदार, गुन्हे शाखा युनिट एक यांनी फिर्याद दिली आहे. प्रथमेश कुमार विटकर (सध्या रा.गांधीनगर भगवद्गीता मंदिराजवळ, खराळवाडी, पिंपरी, मूळ पत्ता- रा. डबा- डिंग- डिंग मित्र मंडळाजवळ, कुसाळकर चौक, जनवाडी, पुणे )असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 यांनी 28 मार्च 2026 रोजी आरोपीस दोन वर्षाकरिता पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, पुणे शहर ,पुणे ग्रामीण हद्दी मधून तडीपार केले आहे. या तडीपार आदेशाचा भंग करून आरोपी हा हद्दीमध्ये आला आहे. आरोपी जवळ प्रतिबंधित पालघन हे हत्यार मिळून आले आहे. संत तुकाराम नगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पवार हे तपास करत आहेत.

