Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

19th September 2026
गुन्हेगारी

बनावट कागदपत्राद्वारे मेडिकल शॉपचा परवाना; दोघा डॉक्टरांवर गुन्हा!

बनावट कागदपत्राद्वारे मेडिकल शॉपचा परवाना; दोघा डॉक्टरांवर गुन्हा!

पिंपरी : मेडिकल शॉपचा परवाना मिळवण्यासाठी अर्ज आणि संमतीपत्रावर बनावट सह्या करून खोटी कागदपत्रे अन्न व औषध प्रशासनाकडे सादर केल्याचा प्रकार समोर आला आहे. या कागदपत्रांच्या आधारे भागीदारीतील परवाना रद्द करून तो स्वतःच्या नावे घेत शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी दोन डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 12 ऑक्टोबर 2023 पासून हा प्रकार मोशी येथील अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयात घडला.

viara vcc
viara vcc

याप्रकरणी संजय मोहनसिंग राठोड (वय 54, रा.मोशी, पुणे )यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. डॉक्टर प्रशांत मधुकर पाटील- कांबळे (वय 34, रा. नायर कॉलनी, साने चौक, चिखली), डॉक्टर रविकांत अशोक हडपद- चिंचवडे (वय 35, रा. चिंचवड रेल्वे स्टेशन जवळ, चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरांची नावे आहेत.

indra dairy
indra dairy

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तळवडे येथे तळवडे मेडिकल शॉप नावाने दुकान आहे. या मेडिकलच्या परवान्या संदर्भात आरोपींनी भागीदारीतील परवाना रद्द करण्यासाठी अर्ज आणि संमती पत्रावर बनावट सह्या केल्या. ही कागदपत्रे खरी असल्याचे भासवून संबंधित कार्यालयाकडून परवाना रद्द करून तो स्वतःच्या नावे करून घेतला. आरोपी रविकांत यांनी परवाना फॉर्म क्रमांक 20 मध्ये परस्पर बदल करून दुसऱ्याचे नाव वगळले. एकाच्याच नावावर परवाना करून भारती एक्सा लाइफच्या चिंचवड शाखेकडून कर्ज घेतल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. या याप्रकरणी दोन्ही डॉक्टरांनी शासनाची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"