Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

19th September 2026
गुन्हेगारी

कामगाराला सुरक्षित उपकरणे न दिल्याने शॉक लागून मृत्यू; एकास अटक!

कामगाराला सुरक्षित उपकरणे न दिल्याने शॉक लागून मृत्यू; एकास अटक!

पिंपरी : कंपनीमध्ये कामगारांना कोणत्याही प्रकारे सुरक्षिततेच्या दृष्टीने शॉप प्रूफ सेफ्टी शूज न पुरवता आणि कामगाराला सुरक्षित नसणारी ग्राइंडिंग मशीन कामासाठी उपलब्ध करून दिली. मशीन द्वारे शॉक लागून कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना बुधवार 16 सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास साईनाथ इंडस्ट्रीज, विठ्ठल नगर, देहूगाव, ता. हवेली येथे घडली.

या प्रकरणी अजयकुमार माणिक राठोड देहूरोड पोलीस ठाणे यांनी फिर्याद दिली आहे. लक्ष्मण नागेश काटकाळकर (वय 52, रा. संभाजीराजे हाउसिंग सोसायटी, गणेशनगर, घर नंबर 136, तळवडे, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

viara vcc
viara vcc

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने कंपनीमध्ये कामगारांना सुरक्षितेच्या दृष्टीने कोणत्याही सुविधा पुरवल्या नाहीत. कामाच्या ठिकाणी कामगारांच्या जागृतीसाठी सूचनाफलक, मार्गदर्शक फलक लावले नाहीत. कंपनीमध्ये इलेक्ट्रिक वायरिंग जागोजागी उघडी ठेवून व वापरण्यास सुरक्षित नसणारी ग्राइंडिंग मशीन कामगार शोवेन रूपचंद माझी यांना वापरण्यास दिली. या मशीन द्वारे कामगाराचा शॉक लागून मृत्यू झाला. देहूरोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरे हे तपास करत आहेत.

indra dairy
indra dairy

तडीपार गुंडास प्रतिबंधित शस्त्रासह अटक!
पिंपरी : तडीपार आदेशाचे उल्लंघन करून स्वतःजवळ प्रतिबंधित शस्त्र बाळगल्याने वाकड पोलिसांनी गुन्हेगारास अटक केली आहे. ही कारवाई गुरुवार 17 सप्टेंबर रोजी रात्री सव्वा आठच्या सुमारास कृष्णा मोबाईल शॉपी समोर, सम्राट चौकाजवळ दत्त मंदिर रोड वाकड येथे करण्यात आली.

याप्रकरणी विक्रम मनोहर भगत पोलीस शिपाई, वाकड पोलीस ठाणे यांनी फिर्याद दिली आहे. नागेश बाळू भंडारी (वय 27, रा. गुलबर्गा, कर्नाटक, मूळ रा. म्हातोबा नगर झोपडपट्टी, दत्त मंदिर रोड, वाकड) असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी नागेश भंडारी यास पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 यांनी 13 एप्रिल 2026 रोजी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, पुणे शहर आणि पुणे ग्रामीण भागातून तडीपार करण्यात आले आहे. आरोपीने कोणतीही परवानगी न घेता पुन्हा पिंपरी चिंचवड हद्दीमध्ये प्रवेश करून प्रतिबंधक घातक शस्त्र कोयता हत्यार स्वतःजवळ ठेवून फिरत होता. वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मारणे, सहाय्यक पोलीस फौजदार दळे हे तपास करत आहेत. तडीपार गुंडास प्रतिबंधित शस्त्रासह अटक!

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"