Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

18th September 2026
गुन्हेगारी

वाहनाच्या ब्लॅक फिल्म कारवाईला विरोध करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल!

वाहनाच्या ब्लॅक फिल्म कारवाईला विरोध करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल!

पिंपरी : वाहनाच्या ब्लॅक फील्मवर कारवाई करण्यास विरोध करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार चिंचवड येथील चाफेकर चौकात बुधवार 16 सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडला.

viara vcc
viara vcc

ज्योती श्रीनिवास ढमाले (वय 49, रा. चिंचवड) यांच्या विरोधात याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

indra dairy
indra dairy

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चिंचवड चाफेकर चौकात वरिष्ठांच्या आदेशानुसार वाहतूक पोलिसांकडून ब्लॅक फिल्म आणि फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहनांवर कारवाई सुरू होती. त्यावेळी एक आलिशान कार जुन्या जकात नाक्याकडे जात होती. गाडीच्या काचांना ब्लॅक फिल्म असल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांनी ती गाडी थांबवली. गाडी चालविणाऱ्या तरुणीला वाहनाची तपासणी करू देण्यास सांगितले. मात्र तिने त्यास विरोध केला. काही वेळाने तेथे आलेल्या ज्योती ढमाले या इनोव्हा कार मधील चालक शीटवर बसल्या.

पोलिसांनी कारवाई सुरू असल्याने गाडी घेऊन जाऊ नये असे सांगितले. मात्र त्यांनी गाडी तेथून नेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी गाडीच्या पुढील उजव्या चाकाला जामर लावला होता. जामर लावल्यानंतरही गाडी मागे घेतल्याने जामरचे नुकसान झाले. ढमाले यांनी वारंवार हॉर्न वाजवून कारवाईला विरोध केला आणि उपस्थित पोलीस व नागरिकांना धोका निर्माण होईल अशा पद्धतीने वाहतुकीला अडथळा निर्माण केला. त्यानंतर वाहतूक नियंत्रण कक्षाला माहिती देऊन चिंचवड पोलिसांना बोलवण्यात आले. चिंचवड पोलीस तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"