Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

13th September 2026
गुन्हेगारी

बनावट दागिने गहाण ठेवून 2 लाखाची फसवणूक!

बनावट दागिने गहाण ठेवून 2 लाखाची फसवणूक!

पिंपरी : आई आजारी असल्याचे सांगून बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून दोन लाख रुपये घेऊन फसवणूक केली. ही घटना गुरुवार 10 सप्टेंबर रोजी इंद्रायणी नदीचे पुलावर, आळंदी घाट, ता. खेड येथे घडली.

याप्रकरणी विक्रांत बबन शेंडगे (वय 25, राठी- साठे वस्ती, धानोरे रोड, सुजुकी शोरूम जवळ, लोहगाव, ता. हवेली) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विजयकुमार (वय अंदाजे 27, रा. आळंदी इंटरनॅशनल स्कूल शेजारी, व विजयकुमार यांच्यासोबत असलेला अनोळखी व्यक्ती व आई यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी क्रमांक एक व दोन एक अनोळखी व्यक्ती यांनी फिर्यादीला विश्वासात घेऊन आरोपीची आई आजारी असल्याचे सांगितले. आरोपी जवळील सोन्याचे दागिने फिर्यादी जवळ गहाण ठेवण्यास देतो असे सांगून फिर्यादी कडून रोख दोन लाख रुपये घेतले. मात्र खोटे ,नकली दागिन्यांची माळ देऊन फिर्यादीची फसवणूक केली. आळंदी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दुधमल हे तपास करत आहेत.

viara vcc
viara vcc

सिक्युरिटी गार्ड कडून कामावर ठेवण्यासाठी वसुली!
पिंपरी : सिक्युरिटी गार्ड यांना नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी देऊन त्या बदल्यात फिर्यादी व अन्य सात सेक्युरिटी गार्ड कडून प्रत्येक महिन्याला दोन हजार रुपये जबरदस्तीने घेऊन शिवीगाळ व मारहाण करून धमकी दिली. ही घटना जानेवारी 2026 ते 10 सप्टेंबर या कालावधीत ग्लोबल डॅनफोस, नवलाख उंब्रे, ता. मावळ, जि. पुणे येथे घडली.

या प्रकरणी सत्यवीर सिताराम सिंग (वय 22, सध्या- रा. बाधलवाडी, ता. मावळ, मूळ- रा. गाव- रणसुख, सीपोडी तहसील, पवनी ठाणा, रणसुख जी रियाशी, जम्मू अँड काश्मीर )यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मोहर सिंग राजाराम राजपूत (वय 40,रा. सिल्वर ट्रेझर बी विंग 702, उर्से रोड, वडगाव, ता. मावळ) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचे सहकारी चैनसिंग, भीषण सिंग, जसबीर सिंग, सागर सिंग, काका रामसिंग, टुणटून दास व इतर सात सेक्युरिटी गार्ड यांना नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिली. कामावर ठेवायचे असेल तर त्या बदल्यात फिर्यादी यांचे कडून एकोणीस हजार आठशे रुपये व प्रत्येक सिक्युरिटी गार्ड यांचे कडून प्रत्येक महिन्याला दोन हजार रुपये जबरदस्तीने घेऊन शिवीगाळ मारहाण करून धमकी दिली. तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक जगदाळे हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"