Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

11th September 2026
देश विदेश

बेकायदेशीर वास्तव्यास असलेल्या नायजेरियन महिलेला पाठविले मायदेशी!

बेकायदेशीर वास्तव्यास असलेल्या नायजेरियन महिलेला पाठविले मायदेशी!

परकीय नागरिक नोंदणी विभाग विशेष शाखा दोनची कारवाई
पिंपरी : मागील दोन वर्षापासून बेकायदेशीर वास्तव्यास असलेल्या नायजेरियन महिलेला ताब्यात घेऊन मायदेशी परत पाठवण्यात आले अशी माहिती पोलीस उपायुक्त विशेष शाखा धीरज पाटील यांनी दिली आहे.

viara vcc
viara vcc

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये हिंजवडी पोलीस ठाणे हद्दीत एक परदेशी महिला ही बेकायदेशीर वास्तव्यास असल्याबाबत गोपनीय माहिती परकीय नागरिक नोंदणी विभाग विशेष शाखा दोन यांना मिळाली होती. सदर महिलेची चौकशी केली असता महिलेचा पासपोर्ट व व्हिसा दोन्ही नसल्याने तिची बायोमेट्रिक पडताळणी ऑनलाईन करण्यात आली. पडताळणी दरम्यान सदर महिलेचे नाव गिफ्ट ओको असून नायजेरियन देशाची नागरिक असल्याची माहिती प्राप्त झाली. ही महिला 23 सप्टेंबर 2014 पासून मेडिकल व्हिसावर भारत देशात आली असून ती जयपूर, पालघर या ठिकाणी वास्तव्यास होती. 2024 पासून तिच्याकडील पासपोर्ट व व्हिसाची वैधता संपलेली असताना देखील ती हिंजवडी येथे वास्तव्यास असल्याचे निदर्शनास आले आहे.

बेकायदेशीर वास्तव्यास असलेल्या नायजेरियन महिलेकडे वैध पासपोर्ट व व्हिसाआणि इतर कोणतेही कागदपत्र नसल्याने तिला मायदेशी परत पाठविण्याकरिता नायजेरियन हाय कमिशन नवी दिल्ली यांचे कडून इमर्जन्सी ट्रॅव्हल डॉक्युमेंट व मुंबई कार्यालयाकडून एक्झिट परमिट प्राप्त करण्यात आले. मंगळवार 8 सप्टेंबर रोजी नायजेरियन महिलेस भारत देशातून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून मूळ नायजेरिया येथे परत पाठविण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सहायुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे सारंग अवाड, पोलीस उपायुक्त विशेष शाखा धीरज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त विशेष शाखा सुनील पंधरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशेष शाखा दोन संजय नरावाड, परकीय नागरिक नोंदणी विभागाकडील श्रीमती राजश्री पावरा, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक शेख यांनी केली.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"