Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

11th September 2026
पिंपरी-चिंचवड

“ज्या कंपनीचा,संस्थेचा कर्मचारीवर्ग आरोग्य संपन्न , ती कंपनीही आरोग्यपूर्ण”:मिलिंद पगारे

“ज्या कंपनीचा,संस्थेचा कर्मचारीवर्ग आरोग्य संपन्न , ती कंपनीही आरोग्यपूर्ण”:मिलिंद पगारे

औद्योगिक क्रीडा संघटनेची योगा स्पर्धा
पिंपरी : “ज्या कंपनीचा,संस्थेचा कर्मचारी वर्ग आरोग्य संपन्न असेल तर ती कंपनीही आरोग्यपूर्ण राहते.“योग” हा आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे”असे मत मिलिंद पगारे (आरएनडी व्हाईस प्रेसिडेंट,बजाज ऑटो आकुर्डी) या स्पर्धेतील विजेतेपदाचा चषक “बजाज ऑटो आकुर्डी संघास” प्रदान करताना व्यक्त केले. वसंत ठोंबरे यांनी उपविजेतेपदाचा चषक टाटा मोटर्सला नरेंद्र कदम, विजय हिंगे व हरि देशपांडे समवेत प्रदान केला.

gokul astami
gokul astami

औद्योगिक क्रीडा संघटनेची “योगा स्पर्धा” ६ सप्टेंबर २०२६, रविवार रोजी मल्टीपर्पज हॉल, बजाज ऑटो आकुर्डी येथे संपन्न झाली. या स्पर्धेसाठी बजाज ऑटो आकुर्डी, महिंद्रा अँड महिंद्रा,टाटा मोटर्स,टीकेआयएल, एसकेएफ, बग्यास, डश्चर, वोडाफोन, माऊली इंटरप्राईजेस, टीटीएल, सँडविक एशिया, इमर्सन, अधिराज एंटरप्राइजेस, शेफलर, एलीन डब्ल्यूजी, आर्मी बेस ५१२, मायक्रोन टेक्नॉलॉजी या १७ कंपन्यांच्या एकूण ५५ खेळाडूंनी भाग घेतला. ही स्पर्धा एकूण ७ गटांमध्ये झाली. या स्पर्धेसाठी महिलांचा प्रतिसाद चांगलाच होता. स्पर्धेसाठी पुणे जिल्हा योगा अँड फिटनेस इन्स्टिट्यूटचे सहकार्य लाभले..प्रत्येक स्पर्धकाने योगासनाची उत्कृष्ट प्रात्यक्षिके दाखवून सर्व प्रेक्षकांची मने जिंकली. या स्पर्धेसाठी प्रख्यात योग प्रशिक्षक चंद्रकांत पांगारे, अतुल काळोखे यांनी विशेष सहकार्य केले.

या स्पर्धेचे उद्घाटन बनारस हिंदू युनिव्हर्सिटी येथे “योगाचे शारीरिक परिणाम” यावर संशोधन केलेल्या यादवेंदर सिंग यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलित करून मल्टीपर्पज हॉल बजाज ऑटो आकुर्डी येथे झाले. उद्घाटन प्रसंगी योग प्रशिक्षक चंद्रकांत पांगारे,औद्योगिक क्रीडा संघटनेचे उपाध्यक्ष नरेंद्र कदम,सचिव वसंत ठोंबरे,खजिनदार प्रदीप वाघ,स्पर्धाप्रमुख हरी देशपांडे,विजय हिंगे,अतुल काळोखे (एडमिन व स्पोर्ट्स मॅनेजर बजाज ऑटो आकुर्डी) मंदार कुलकर्णी,अमित कदम,मिनार गजने,सचिन कांबळे (जेसीबी स्पोर्ट्स कमिटी),दिनेश भुजबळ (महिंद्रा अँड महिंद्रा स्पोर्ट्स कमिटी),संतोष शिंदे,किरण कंक,सुशांत पाटील(एसकेएफ स्पोर्ट्स कमिटी), दुष्यंत गायकवाड(सँडविक एशिया एम्प्लॉईज स्पोर्ट्स कमिटी),टाटा मोटर्स स्पोर्ट्स कमिटीचे शशि कात्रे,केतन बालवडकर, राहुल कापसे (प्राज स्पोर्ट्स कमिटी),दयानंद प्रक्षाले (ॲटलास स्पोर्ट्स कमिटी), राहुल चावरिया (पिसीएमसी स्पोर्ट्स कमिटी) उपस्थित होते.

या स्पर्धेचे पारितोषिक वितरण मिलिंद पगारे (आरएनडी व्हाईस प्रेसिडेंट,बजाज ऑटो आकुर्डी),सतीश काळे,नितीन कदम, शैलेश जाधव,राजू नातू,यशवंत लोंढे,अतुल काळोखे यांच्या शुभहस्ते झाले. या स्पर्धेचे सूत्रसंचालन प्रदीप वाघ यांनी तर प्रास्ताविक वसंत ठोंबरे यांनी केले व आभार प्रदर्शन अतुल काळोखे यांनी केले.या स्पर्धेचे संपूर्ण प्रक्षेपण(यूट्यूब) मंदार कुलकर्णी यांनी केले.

स्पर्धेचे निकाल खालील प्रमाणे
१८ ते ३० वर्षे पुरुष गट :-१)विपुल भोसले (बजाज ऑटो आकुर्डी) १४४ गुण २)पार्थ पटेल (बजाज ऑटो आकुर्डी) १४२.५ गुण ३)पवन यादव (मायक्रोन टेक्नॉलॉजी) १०७.५ गुण ४)हिमांशु तिवारी (बजाज ऑटो आकुर्डी) ९५.५ गुण.
३१ ते ४० वर्षे पुरुष गट:-१)सुकेत शाह(एसएमसी कार्पोरेशन) १५६.५ गुण २)प्रमोद उगले (बजाज ऑटो आकुर्डी) १५१.५ गुण ३) समीर मस्के (सँडविक एशिया) १४५ गुण ४)राहुल पाटीदार (टाटा मोटर्स) १४४.५ गुण.
४१ ते ५० वर्षे पुरुष गट:-१)अभिजीत लोखंडे (टाटा मोटर्स)१३७ गुण २)हनुमंत गोरनाळे (सँडविक एशिया)१३२.५ गुण ३) उत्तम भोसले (टाटा मोटर्स) १३०.५ गुण ४) प्रमोद कांबळे (टीकेआयएल) १२८ गुण.
५१ ते ६० वर्षे पुरुष गट:-१)मारुती वाळुंज (टाटा मोटर्स) १५१ गुण २)हेमंत पवार (टाटा मोटर्स) १३८ गुण ३)रवींदर शर्मा (बजाज ऑटो आकुर्डी )१३४.५ गुण ४)श्री सुरेश विश्वनाथ (आर्मीबेस) १२० गुण.
६० वर्षांपुढील पुरुष गट:-१)चंद्रकांत पांगारे (बजाज ऑटो आकुर्डी) ८५ गुण २)गोविंद शिरोळे (बजाज ऑटो आकुर्डी) ७७.५ गुण
१८ ते ३० वर्षे महिला गट:-१)जुई पांगारे (बजाज ऑटो आकुर्डी) १६३ गुण २)दीक्षा डाळे १४३.५ गुण ३) शितल गोरे (बजाज ऑटो आकुर्डी) १४१ गुण ४)पूजिमा सबीनीनी (बजाज ऑटो आकुर्डी) १३२.५ गुण.
३० वर्ष पुढील महिला गट:-१)प्रियंका मुर्हे (माऊली इंटरप्राईजेस) १५१.५ गुण २)अर्चना निंबाळकर (बजाज ऑटो आकुर्डी )१४५ गुण ३)स्नेहल खोल्लम (बग्यास) १४० गुण ४)प्राजक्ता कानडे (वोडाफोन) १२९ गुण.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"