Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

26th October 2026
गुन्हेगारी

हॉटेलच्या इमारतीतील तीन पत्त्यांच्या जुगारावर छापा;आठ जण ताब्यात!

हॉटेलच्या इमारतीतील तीन पत्त्यांच्या जुगारावर छापा;आठ जण ताब्यात!

पिंपरी : हॉटेलच्या इमारतीत तीन पत्त्यांचा जुगार सुरू असताना पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना ताब्यात घेतले. घटनास्थळावरून रोख रकमेसह जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई शुक्रवार चार सप्टेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास थरमॅक्स चौकाजवळील हॉटेल ऐश्वर्या येथे करण्यात आली.

gokul astami
gokul astami

याप्रकरणी पोलीस शिपाई दीपक भिसे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विनोद बाबुभाई पटेल (वय 65, निगडी), मनसुख गोवर्धन परमार (वय 41, रा. निगडी), दामजी लक्ष्मण वरु (वय 67, रा. गुजरात), रशींगधर मशीग परमार (वय 60, निगडी), अशोक नारायण राठोड (वय 58, रा. पिंपरी), दिनेश उद्धवजी चव्हाण (वय 51, रा. निगडी), ललित गिरधर परमार (वय 48, रा. निगडी आणि हॉटेल व्यवस्थापक व जागा मालक प्रकाशन यल्लाप्पा कराईल (वय 68, रा. चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करत आहेत.

कंपनीतून 70 हजारांचे पार्ट चोरीला!
पिंपरी : कंपनीच्या मशीन शॉप विभागात ठेवलेले 70 हजार रुपये किंमतीचे शंभर इन्सर्ट पार्ट अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना 25 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या कालावधीत उर्से येथील सीआयइ ऑटोमोटिव्ह कंपनीत घडली.

या प्रकरणी आकाश मधुकर गराडे (वय 35, रा. धामणे, मावळ) यांनी फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनीच्या मशीन शॉप विभागात विविध यंत्रासाठी वापरण्यात येणारे 100 इन्सर्ट पार्ट ठेवण्यात आले होते. अज्ञात चोरट्यांनी कोणाच्याही लक्षात न येता 70 हजार रुपये किंमतीचे हे पार्ट चोरून नेले. चोरीचा प्रकार निदर्शनास आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली आहे. शिरगाव पोलीस तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"