Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

12th September 2026
गुन्हेगारी

सांगवी महिलेच्या मृत्युपकरणी अखेर गुन्हा दाखल;दोघांना अटक!

सांगवी महिलेच्या मृत्युपकरणी अखेर गुन्हा दाखल;दोघांना अटक!

मंडळाचा अध्यक्ष, मंडप उभारणारा आणि साऊंड सिस्टिम मालक अशा तिघा विरोधात गुन्हा दाखल
पिंपरी : जुनी सांगवी येथे दहीहंडी कार्यक्रमासाठी उभारलेले हँगिंग साऊंड आणि त्याचे लोखंडी स्ट्रक्चर अंगावर पडून महिलेचा मृत्यू झाल्यानंतर सुरुवातीला केवळ अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. अखेर सांगवी पोलिसांनी मंडळाचा अध्यक्ष, मंडप उभारणारा आणि साऊंड सिस्टिम मालक अशा तिघा विरोधात गुन्हा दाखल केला असून यातील दोघांना अटक करण्यात आली आहे.

gokul astami
gokul astami

सलमा सलुद्दीन पठाण (वय 52) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माळेगावे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मंडप आणि लोखंडी स्ट्रक्चर उभारणारा मेहबूब उर्फ श्याम रमजान शेख (वय 27), स्पीकर साऊंड सिस्टिम उपलब्ध करून देणारा कुणाला अनिल भोगावडे (वय 29), विघ्नहर्ता दहीहंडी मंडळाचे अध्यक्ष अमोल धर्मराज बेलदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख आणि भोगावडे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

शुक्रवार 4 सप्टेंबर रोजी जुनी सांगवी येथील विघ्नहर्ता दहीहंडी मंडळाचा कार्यक्रम पाहण्यासाठी सलमा आणि त्यांचे पती सलाउद्दीन हे गेले होते. दहीहंडीचा कार्यक्रम संपल्यानंतर ते तिथून निघत असताना हँगिंग साऊंड आणि त्याचे लोखंडी स्ट्रक्चर अचानक खाली कोसळले. यामध्ये सलमा यांचा मृत्यू झाला आहे. घटनेनंतर सलमा यांचा मुलगा रहीम पठाण हा संबंधित दहीहंडी मंडळाचा कार्यकर्ता असल्याने त्याने पोलिसाकडे तक्रार नसल्याचे सांगितले होते. तसेच मंडळाविरोधात स्वतःहून कारवाई करू नये अशी विनंती ही केल्याचे पोलिसांनी सांगितले.

कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेले अवजड साऊंड आणि लोखंडी स्ट्रक्चर कोसळून एका महिलेचा जीव गेल्यानंतरही गुन्हा दाखल न झाल्याचा मुद्दा माध्यमांनी लावून धरला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सांगवी महिलेच्या मृत्युपकरणी अखेर गुन्हा दाखल

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"