Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

11th September 2026
गुन्हेगारी

दारूच्या नशेत जीवे मारण्याचा प्रयत्न सात जणांना अटक

दारूच्या नशेत जीवे मारण्याचा प्रयत्न सात जणांना अटक

पिंपरी : दारूच्या नशेत झालेल्या वादातून एका तरुणावर बियरच्या बाटलीने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणातील सात आरोपींना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने सहा तासात अटक केली आहे. ही घटना बुधवार 19 ऑगस्ट रोजी पहाटे एकच्या सुमारास भोसरी- आळंदी रोड येथील रूपाली बार अँड रेस्टॉरंट समोर घडली.

viara vcc
viara vcc

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमर कापडे हा गंभीर अवस्थेत पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कापडे याला तातडीने वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता दहा ते बारा अनोळखी व्यक्तींनी कापडे याला गंभीर जखमी करून दुचाकीवरून पळ काढल्याचे दिसून आले.

पोलिसांनी खबऱ्याच्या मदतीने संशयितांची ओळख पटवून ते चरवली येथील प्रिझम सिटी सोसायटी परिसरात असल्याची माहिती मिळाली. युनिट तीनच्या  दोन पथकांनी परिसरात शोध मोहीम राबवली. सोसायटीच्या गेट जवळ थांबलेले आरोपी पोलिसांना पाहून अंधाराचा फायदा घेत पळून  जाऊ लागले. पोलिसांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. महेश प्रकाश पाटील (वय 30, रा. भोसरी), केतन दिनकर सोमवंशी (वय 23, रा चऱ्होली), विकास अशोक मयनाळे (वय 25, रा. भोसरी), प्रथमेश राजू पाटील (वय 21, रा. भोसरी), पवन रोहिदास शिंदे (वय 22, रा. भोसरी) यांना अटक करण्यात आली.

आरोपींकडे चौकशी केली असता दारूच्या नशेत झालेल्या वादातून अमर कापडे यांच्यावर बियरच्या बाटलीने वार केल्याची कबुली आरोपींनी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे, उपनिरीक्षक भरत गोसावी, बाबासाहेब गर्जे, सोमनाथ बोर्हाडे, बाळासाहेब खेडकर ,अजित रुपनवर, निखिल फपाळे, नितीन गुंजाळ, दिलीप राठोड, शशिकांत नांगरे, सुंदर थोरात ,श्रीधन इचके , प्रदीप राळे यांच्या पथकाने केली.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"