बळजबरीने मोबाईल व 20 हजार रोख रक्कम हिसकावली!

पिंपरी : मनी ट्रान्सफर करण्यासाठी जात असताना तीन व्यक्तींनी जबरदस्तीने कार मध्ये बसण्यास सांगून मोबाईल काढून घेऊन आय एम ई आय नंबर घेऊन व रोख रक्कम 20000 जबरदस्तीने हिसकावून घेऊन गेले. ही घटना 15 ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास विशाल मोबाईल शॉपी, मधला पेठा जाधववाडी, चिखली) येथे घडली.

याप्रकरणी रंजनकुमार नंदकिशोर राजभर (वय 25, रा. सातव यांच्या खोलीत, कॉलनी क्रमांक आठ, जाधववाडी, चिखली यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. गणेश पांडुरंग क्षीरसागर (वय 27, सुहास उर्फ डेव्हिड व पप्पू चव्हाण (दोघांचा पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे मनी ट्रान्सफर करण्यासाठी जात असताना आरोपी क्रमांक एक, दोन व तीन यांनी फिर्यादी यांना त्यांच्या कारमध्ये बसण्यास सांगून थोड्या अंतरावर गेल्यावर खाली उतरवून फिर्यादी जवळील काळ्या रंगाचा ओपो कंपनीचा मोबाईल व आय एम ई आय नंबर घेऊन रोख रक्कम 20 हजार रुपये जबरदस्तीने हिसकावून घेतली. चिखली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मोटे व काळोखे हे तपास करत आहेत.

