वाहन चोरी करणारी टोळी जेरबंद;सात मोटरसायकली व 24 मोबाईल फोन हस्तगत!

बावधन पोलीस ठाण्याची कारवाई
पिंपरी : महाळुंगे -नांदे रोडवर बावधन पोलीस ठाणे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना युनिकॉन मोटरसायकल वरून दोन व्यक्ती संशयिरीत्या जाताना दिसल्याने त्यांना थांबण्याचा इशारा केला परंतु ते न थांबता पळून गेले पोलिसांनी काही अंतरावर पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले आणि चौकशी केली. या चौकशीत आरोपीं कडून 5 लाख 35 हजार रुपये किंमतीच्या करण्यात आला अशी माहिती पोलीस उपायुक्त परिमंडळ क्रमांक दोनचे प्रदीप जाधव यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बावधन पोलीस ठाण्याचे पोलीस हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना महाळुंगे -नांदे रोडवर एक युनिकॉर्न मोटरसायकलवर दोन्ही व्यक्ती संशयितरित्या जाताना दिसल्याने त्यांना थांबवण्याचा इशारा केला. परंतु ते पळून जात असताना काही अंतरावर पोलिसांनी पाठलाग करून त्यांना थांबवले. त्यांच्या युनिकॉर्न गाडीला नंबर प्लेट नसल्याने विचारणा करण्यात आली असता त्यांनी उडवा गुढीची उत्तरे दिली .त्यांच्याबाबत संशय निर्माण झाल्याने त्यांना युनिकॉन मोटरसायकल घेऊन बावधन पोलीस ठाण्यात आणण्यात आले. नाव, पत्ता विचारले असता त्यांनी अनिल लहू जाधव (वय 20 रा. शिव वजन काटा मागे महाळुंगे- नांदे रोड व विधी संघर्षित बालक अशी नावे सांगितली.
त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता जाधव याने गुन्ह्याची कबुली देऊन सांगितले की, त्यांचे साथीदार वसंत अंकुश जाधव (वय 25, रा. सुतारवाडी ,ता. मुळशी), सुनील लहू जाधव (वय 25, रा. सुतारवाडी, ता. मुळशी) अशी आहेत. बावधन, हिंजवडी, शिरगाव परंदवडी परिसरात मोटरसायकल व मोबाईल चोरीचे गुन्हे केले असल्याची कबुली दिली. त्या अनुषंगाने तपास केला असता आरोपीकडून एकूण सात गुन्हे उघड करीत 5 लाख 35 हजार रुपये किंमतीच्या सात मोटरसायकली व 24 मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई प्रदीप जाधव (पोलीस उपायुक्त, परिमंडळ 2), विठ्ठल कुबडे (सहाय्यक पोलीस आयुक्त) हिंजवडी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली बावधन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, पोलीस निरीक्षक गुन्हे, परवेज शिकलगार, गुन्हे प्रगटीकरण पथक पोलीस उपनिरीक्षक, सारंग ठाकरे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक, राजेंद्र काळे सहाय्यक पोलीस फौजदार, बापूसाहेब धुमाळ पोलीस हवालदार , अरुण नरळे, फारुख मुल्ला ,नितीन चंदनशिव, महेश शिंदे, आतिश जाधव, दत्ता शिंदे, बाबासाहेब पोटे ,स्वप्निल साबळे ,अक्षय लाटे, ऋषिकेश पाटील, मंगेश लोखंडे यांनी केली.

