Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

12th September 2026
गुन्हेगारी

150 कोटी रुपयांची सायबर फ्रॉड फसवणुक करणा-या टोळीतील आरोपीस अटक!

150 कोटी रुपयांची सायबर फ्रॉड फसवणुक करणा-या टोळीतील आरोपीस अटक!

विविध राज्यातील 65 नागरिकांना इन्व्हेस्टमेंट फ्रॉड व इतर फ्रॉड प्रकारामध्ये अडकवून फसवणूक
पिंपरी : विविध राज्यातील 65 नागरिकांना इन्व्हेस्टमेंट फ्रॉड व इतर फ्रॉड प्रकारामध्ये अडकवून एकूण 150 कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील सचिन संजय काळे (वय 25, गोडाऊन चौकाजवळ, मोशी, ता. हवेली) या आरोपीस आळंदी पोलिसांनी अटक केली आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 चे मारुती जगताप यांनी दिली आहे.

viara vcc
viara vcc

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आळंदी पोलीस स्टेशन येथे स्थापन केलेल्या सायबर सेलने म्युल अकाउंटच्या अनुषंगाने माहिती काढून आरोपी सचिन संजय काळे याचे कॉसमॉस बँक आळंदी येथे असलेले बचत खाते हे ऑनलाइन फ्रॉडच्या माध्यमातून मिळविलेली रक्कम प्राप्त करण्यासाठी वापरत असल्याची माहिती मिळाली होती. यावरून आळंदी पोलीस स्टेशन येथे दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्याचा तपास करत असताना आरोपीने वेगवेगळ्या नऊ बँकांमध्ये खाते उघडून सदरचे खाते हे सायबर फ्रॉड मधील आलेली रक्कम स्वतःच्या खात्यावर घेऊन ती एटीएम तसेच चेकच्या माध्यमातून काढली आहे. विविध राज्यातील एकूण 65 नागरिकांची सुमारे 150 कोटी रुपये इतकी रकमेची फसवणूक झाली असल्याचे एनसीसीआरपी पोर्टल वरती उपलब्ध माहितीवरून दिसून आले आहे.

या रकमेपैकी आरोपी सचिन काळे यांनी विविध नऊ बँक खात्यात 1 कोटी 15 लाख रुपये स्वीकारल्याचे दिसून आले. यावरून त्यास अटक करण्यात आली. काळे यांच्याबरोबर इतर सह आरोपी कोण आहेत का याबाबतची चौकशी पोलीस करत आहेत.

ही कारवाई मारुती जगताप (पोलीस उपायुक्त परिमंडळ क्रमांक तीन) , योगेश रांजनकर (सहाय्यक पोलीस आयुक्त चाकण विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बीएस नरके, उपनिरीक्षक तुकाराम खडके, पोलीस हवलदार आरती निकम, पोलीस शिपाई सोळंके, जगताप यांनी केली.

याप्रकरणी पोलिसांनी नागरिक, विद्यार्थी, व्यावसायिक यांना आव्हान केले आहे की, कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपल्या नावे असलेली बँक खाते किंवा सिम कार्ड वापरण्यास देऊ नये. अनोळखी व्यक्तीकडून ऑनलाइन स्वरूपात पैसे स्वीकारून रोख स्वरूपात पैसे एटीएम मधून किंवा चेक द्वारे काढून देऊ नयेत. कारण सदरची रक्कम ऑनलाइन फसवणुकीतील असू शकते.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"