Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

13th September 2026
गुन्हेगारी

दहा वर्षीय चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन!

दहा वर्षीय चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन!

पिंपरी : ताथवडे येथील दहा वर्षीय चिमुकली वरील अत्याचार प्रकरणाचा तपास अधिक वेगाने करण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापन केले आहे. या पथकात पाच अधिकारी आणि पाच कर्मचाऱ्यांचा समावेश असून सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुऱ्हाडे यांच्याकडे या तपासाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

viara vcc
viara vcc

विशेष तपास पथकाच्या माध्यमातून गुन्ह्यातील सर्व पुरावे, साक्षी आणि तांत्रिक बाबींची सखोल पडताळणी करून तपास लवकरात लवकर कमी कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर न्यायालयात आरोप पत्र दाखल करण्यासाठी पोलिसांकडून युद्धपातळीवर हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत .या प्रकरणातील आरोपीला शिवाजीनगर न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सनावली आहे. या कालावधीत सखोल चौकशी केली जाणार आहे.

ताथवडे परिसरात जीवे मारण्याची धमकी देऊन दहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. फिर्यादीच्या दहा वर्षीय मुलीला चाकूने पोट चिरेल अशी धमकी देऊन घरात कोणी नसताना तोंड दाबून आरोपीने स्वतःच्या घरात नेऊन अत्याचार केला.. मे ते 27 जुलै या कालावधीत हा प्रकार घडला आहे. रमजान बन्नूसाहब बागवान (वय 65, रा. ताथवडे )असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 30 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"