Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

11th September 2026
गुन्हेगारी

तडीपार व शस्त्र प्रतिबंधक आदेशाचे उल्लंघन; गुन्हेगारास अटक!

तडीपार व शस्त्र प्रतिबंधक आदेशाचे उल्लंघन; गुन्हेगारास अटक!

पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस उपायुक्त परिमंडळ एक यांनी दोन वर्षाकरिता तडीपार केलेल्या गुन्हेगाराने पुन्हा हद्दीत प्रवेश करून आणि घातक शस्त्र जवळ बाळगून आदेशाचे उल्लंघन केल्याने अटक करण्यात आली आहे. ही कारवाई मंगळवार 28 जुलै सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास वसंतदादा पुतळ्यासमोरील गणपती विसर्जन घाटावरील रस्त्यावर, जुनी सांगवी येथे करण्यात आली.

viara vcc
viara vcc

याप्रकरणी शैलेश गुलाब मगर पोलीस हवालदार, सांगवी पोलीस स्टेशन यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. अक्षय दशरथ शिंदे (वय 23, रा. जगताप पेट्रोलपंपा शेजारी, वैदू वस्ती, पिंपळे गुरव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी शिंदे यास पिंपरी चिंचवड पोलीस उपायुक्त परिमंडळ एक यांनी पिंपरी चिंचवड आयुक्तालय ,पुणे पोलीस आयुक्तालय, पुणे ग्रामीण हद्दीतून दोन वर्षाकरिता तडीपार केले होते. परंतु आरोपी बेकायदेशीररित्या आदेशाचे उल्लंघन करून पुन्हा हद्दीमध्ये आला होता. याशिवाय त्याच्याकडे एक लोखंडी कोयता विनापरवाना आढळून आला. आदेशाचा भंग झाल्याने. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"