Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

29th October 2026
गुन्हेगारी

तडीपार आदेशाचे उल्लंघन केल्याने आरोपीस अटक!

तडीपार आदेशाचे उल्लंघन केल्याने आरोपीस अटक!

पिंपरी : पिंपरी चिंचवड उपायुक्त परिमंडळ एकच्या आदेशानुसार तडीपार असताना या आदेशाचे उल्लंघन करून पुन्हा शहरात दाखल झाल्याने आणि घातक शस्त्र बाळगल्याने एका गुन्हेगारास अटक करण्यात आली आहे. ही कारवाई 26 जुलै 2026 रोजी रात्री साडेदहा वाजता गंधर्वगरिमा लॉन्स पाठीमागे, हिराबाई झोपडपट्टीकडे जाणाऱ्या रस्त्यावर, कासारवाडी येथे करण्यात आली.

याप्रकरणी आकाश श्रावण सोनवणे पोलीस शिपाई, दापोडी पोलीस स्टेशन यांनी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. अर्शद हनीफ सय्यद (वय 26, रा. जामा मशीद समोर कासारवाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तडीपार आरोपी हर्षद सय्यद यास पिंपरी चिंचवड पोलीस उपायुक्त परिमंडळ एक यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा 56 (एक) (ब)नुसार पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्द, पुणे शहर व पुणे ग्रामीण पोलीस हद्दीतून सहा महिने करिता तडीपार केले असताना त्याने या आदेशाचे उल्लंघन करून कोणतीही परवानगी न घेता आदेशाचा भंग केला आहे. याशिवाय एक लोखंडी कोयता हे घातक शस्त्र विनापरवाना बेकायदेशीररित्या जवळ बाळगल्याचे आढळून आले. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये घातक शस्त्र जवळ बाळगण्यास मनाई आदेश असताना या आदेशाचा भंग केला. दापोडी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार शेडगे हे तपास करत आहे.

viara vcc
viara vcc

सायबर फसवणुकीसाठी बँक खाते भाड्याने दिल्याने तरुणावर गुन्हा दाखल
पिंपरी : आरोपी साथीदारांना स्वतःचे बँक खाते सायबर फसवणुकीतील आर्थिक व्यवहारासाठी भाड्याने दिल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना महाळुंगे, चाकण, तळेगाव रोड येथे सहा नोव्हेंबर 2025 ते 18 फेब्रुवारी 2026 या कालावधीत घडली

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल समीर महात (वय 22) यांनी उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. अजय नेताजी सुतार (वय 25, रा. महाळुंगे गाव, ता. खेड) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने बँक ऑफ बडोदाच्या महाळुंगे शाखेत स्वतःचे खाते उघडले. आर्थिक फायद्याच्या उद्देशाने हे खाते सायबर गुन्हेगारांना वापरण्यास भाड्याने दिले. तपासात या खात्यावर भारतातील सात नागरिकांचे 62 हजार रुपये जमा झाल्याचे उघड झाले आहे. उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस तपास करीत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"