खडकवासला धरण 100 टक्के भरले; 27 हजार पेक्षा जादा विसर्ग मुठा नदीमध्ये!

पुणे : खडकवासला धरण साखळीत मंगळवारी रात्री झालेल्या पावसामुळे धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आले आहे खडकवासला धरणातून 27 हजार पेक्षा जादा विसर्ग मुठा नदीमध्ये सोडण्यात येत असल्याने नदीपात्रातील रस्ते , भिडे पुल पाण्याखाली गेले आहेत. मुठा नदी दुधडी भरुन वाहत आहे.

मुठा नदीपात्रातील रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले असून नदीपात्राकडे जाणाऱ्या रस्त्यांवर लोखंडी बॅरिकेट्स टाकण्यात आले आहेत खडकवासला धरण साखळीत मंगळवारी रात्री मुसळधार पाऊस झाला मुसळधार पावसामुळे धरणातील पाणी पातळीत वाढ झाल्याने धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. बुधवारी सकाळी धरणातून 27 हजार पेक्षा जादा विसर्ग मुठा नदीमध्ये सोडण्यात आले शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिर ते डेक्कन जिमखाना डेक्कन जिमखाना ते एरंडवणे भागातील रजपूत वीट भट्टी परिसरातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत
वडिवळे धरणातून विसर्ग
वडिवळे धरणाचा पाणीसाठा नियंत्रित करणेसाठी दुपारी १२वाजता वडिवळे धरणाच्या सांडव्यातून नदीपात्रात सुरु असणारा १०४९१ क्युसेक्स इतका विसर्ग कमी करुन ५०४८ क्युसेक्स करण्यात येणार आहे. पाऊस चालू राहिल्यास व येवा वाढत गेल्यास परिस्थितीनुसार विसर्ग कमी-जास्त करण्यात येईल. अशी माहिती दि.म.डुबल, कार्यकारी अभियंता,पुणे पाटबंधारे विभाग,पुणे यानी दिली.
आंद्रा धरण ७५% भरले
आंद्रा धरणाच्या ,(ता. मावळ) पाणलोट क्षेत्रा मध्ये पावसाच्या प्रमाणात वाढ झालेली असून धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. दिनांक ०८/०७/२०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता आंद्रा धरण ७४.७५% म्हणजेच अंदाजे ७५% भरलेले आहे.
सध्या धरणातून सांडवा अथवा ICPO द्वारे कोणताही विसर्ग सुरू नाही. तथापि धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असल्याने व येत्या काही तासात काळात पावसाच्या प्रमाणात वाढ झाल्यास आंद्रा धरणाच्या द्वारविरहित सांडव्याद्वारे (Ungated Spillway) येत्या काही तासात अनियंत्रित विसर्ग सुरू होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आंद्रा धरणाखालील नदीकाठच्या गावांना, तसेच इंद्रायणी नदी व सुधा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.

