कौटुंबिक वादावरून सुरू झालेल्या भांडणात पुतण्याचा खून!

पिंपरी : विविध कौटुंबिक वादावरून सुरू झालेल्या भांडणात चुलत्याने लोखंडी रॉड ने डोक्यात वार करून पुतण्याचा खून केला. ही घटना बुधवार एक जून रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास काळेवाडी येथील जीवन चौकात घडली.

याप्रकरणी रोशन उर्फ मयूर राजेंद्र पाखरे (वय 29, रा. काळेवाडी) यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संजय उमाजी पाखरे (वय 62, रा. जीवन चौक काळेवाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीचा भाऊ गणेश राजेंद्र पाखरे (वय 32) आणि आरोपी संजय पाखरे यांच्यात घराच्या वाटणीवरून वाद सुरू होता. गणेश यांना नोकरी लागल्याचा राग आरोपीच्या मनात होता. तसेच आरोपीची पत्नी व मुले फिर्यादीच्या कुटुंबामुळे आपल्याला सोडून गेल्याचा संशय ही आरोपीला होता. या रागातून आरोपीने गणेशाच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करून त्याचा खून केला. काळेवाडी पोलीस तपास करत आहेत.

