अल्पवयीन मुलाकडून गावठी पिस्तूल जप्त!

पिंपरी : भोसरी एमआयडीसी परिसरातील लेबर कॅम्प जवळ संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या एका अल्पवयीन मुलांकडून गावठी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. ही कारवाई रविवार 28 जून रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
याप्रकरणी बाजीराव सानप पोलीस शिपाई यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार क्रांती चौकाकडून पंतप्रधान आवास योजनेकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक अल्पवयीन मुलगा संशयस्पदरीत्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे चाळीस हजार पाचशे रुपये किंमतीचे गावठी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत काडतूस आढळून आले. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करीत आहे.

86 हजार रुपये किंमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त!
पिंपरी : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला तंबाखूजन्य पदार्थ एका व्यक्तीने पान शॉप मध्ये विक्री करता जवळ बाळगला. याप्रकरणी एका व्यक्तीस अटक करण्यात आली आहे. ही कारवाई शुक्रवार 26 जून रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास रावेत ते वाल्हेकरवाडी कडे जाणाऱ्या रस्ता, जाधव घाट रोड, पवार पान शॉप या टपरीमध्ये घडली.
याप्रकरणी विनायक सुभाष मराठे पोलीस कॉन्स्टेबल, रावेत पोलीस ठाणे यांनी फिर्याद दाखल केली आहे .अक्षय चिमाजी ढवळे (वय 28, रा. पिंपळे गुरव, लेन नंबर 6, सांगवी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी याने महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला 86 हजार 600 रुपये किंमतीचा तंबाखूजन्य माल विक्रीसाठी आरोपीने आपल्या पान शॉप वर ठेवला होता. यामध्ये सुगंधी तंबाखूजन्य पदार्थ, सुगंधी सुपारी (गुटखा) यासह पोलिसांनी आरोपीची दुचाकी मोटर सायकल असा मुद्देमाल जप्त केला आहे. रावेत पोलीस ठाण्याचे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सोनवणे हे तपास करीत आहेत.

