Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

6th July 2026
गुन्हेगारी

तीन लोखंडी पिस्टल विक्री करिता बाळगल्याने एकास अटक!

तीन लोखंडी पिस्टल विक्री करिता बाळगल्याने एकास अटक!

पिंपरी : घातक शस्त्र बाळगण्यास प्रतिबंध असताना एका व्यक्तीने तीन लोखंडी पिस्टल व सहा जिवंत काडतूस विक्री करिता बाळगल्याने अटक करण्यात आली आहे. ही कारवाई 25 जून रोजी 4:15 वाजण्याच्या सुमारास गाव जत्रा मैदानाजवळ, ट्रॅव्हल्स पार्किंग मध्ये, धावडे वस्ती, भोसरी येथे करण्यात आली .

viara vcc
viara vcc

याप्रकरणी शुभम तानाजी कदम (वय 34 पोलिस अंमलदार, गुंडाविरोधी पथक यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. शब्बीर उर्फ मलिक जहांगीर शेख (वय 38, रा. वनदेवी मंदिरासमोर बराटे चाळ, गोसावी वस्ती, कर्वेनगर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये घातक शस्त्र बाळगण्यास बंदी असताना या बंदीचे उल्लंघन करून आरोपी शब्बीर जहांगीर शेख याने 1 लाख 66 हजार 100 रुपये किंमतीचे तीन लोखंडी पिस्टल व सहा जिवंत काडतूस विक्रीकरिता जवळ बाळगल्याचे आढळून आले .पोलिसांनी मोबाईल फोन व अन्य मुद्देमाल जप्त केला आहे. भोसरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक खाडे हे तपास करत आहेत.

सोरट जुगार अड्ड्यावर छापा!
पिंपरी : आळंदी येथील एसटी स्टँड परिसरातील पत्राशेडमध्ये सुरू असलेल्या सोरट जुगार अड्ड्यावर दिघी पोलिसांनी छापा टाकून सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई बुधवार 24 जून रोजी करण्यात आली.

याप्रकरणी पोलीस शिपाई चंद्रकांत सोपानराव गाडे यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विनोद नारायण जाधव (वय 38, रा.डुळगाव), रामेश्वर शशीशेखर दांडे (वय 40), अशोक सटवाजी वाबळे (वय 45) यांच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"