Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

6th July 2026
पिंपरी-चिंचवड

महामेट्रोला अखेर 50 कोटींचा निधी देण्यास स्थायी समितीची मंजुरी!

महामेट्रोला अखेर 50 कोटींचा निधी देण्यास स्थायी समितीची मंजुरी!

पिंपरी : पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गाचे विस्तारीकरणाचे काम सुरू असून निगडी येथील टिळक चौकात चौथा अतिरिक्त मेट्रो स्टेशन उभारण्यासाठी महापालिकेचा 50 कोटी रुपयांचा हिस्सा देण्यास अखेर स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. महापालिका स्थायी समितीमध्ये याबाबत चर्चा होऊन निर्णय घेण्यात आला. सभेचे अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे होते.

viara vcc
viara vcc

महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेड मार्फत निगडी ते पिंपरी या मेट्रो मार्गाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. हे काम करत असताना सर्विस रस्ता नादुरुस्त झाल्याने वाहन चालकांची गैरसोय होत आहे. त्यातच सध्या पावसाचे दिवस असल्याने आणखीनच अडचण निर्माण होईल. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती केल्यानंतरच निधी देण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला होता .त्यामुळे स्थायी समितीत हा विषय तहकूब ठेवला जात होता. याची दखल घेऊन महा मेट्रोने सर्विस रस्त्यावर दुरुस्तीचे काम केले आहे. तसेच पालखी सोहळ्यापूर्वी उर्वरित दुरुस्ती केली जाणार आहे. याचा विचार करून महा मेट्रोला निधी देण्यास मान्यता देण्यात आली आहे असे अभिषेक बारणे यांनी सांगितले.

यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील 14 पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडील वार्षिक मान्यता प्रक्रियेसाठी आवश्यक शुल्क अदा करण्यात येणार आहे. महापालिका भवन इमारतीतील स्ट्रक्चरल ऑडिट नुसार आवश्यक दुरुस्तीची कामे करणे, महापालिका सभागृहाचे नूतनीकरण करणे, अर्बन स्ट्रीट डिझाईन नुसार विकसित करण्यात आलेल्या रस्ते व सार्वजनिक सुविधांच्या देखभाल दुरुस्ती करणे या कामांना मंजुरी देण्यात आली. मामुर्डी येथील साईनगर उंच जलकुंभाच्या जलक्षेत्रात नव्याने विकसित होत असलेल्या भागात नवीन जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. पुनावळे येथील अग्निशामक केंद्राच्या बांधकामासाठी वाढीव 13 कोटी 16 लाख 40 हजार 977 स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"