फक्त मुद्द्याचं!

23rd June 2026
पिंपरी-चिंचवड

४१२ कोटी रुपयांच्या मालमत्ता कर संकलनाचा टप्पा पार!

४१२ कोटी रुपयांच्या मालमत्ता कर संकलनाचा टप्पा पार!

मालमत्ता करावरील सवलतींचा लाभ घेण्यासाठी शेवटचे ८ दिवस
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये मालमत्ता कर संकलनात ४१२ कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. दि. १ एप्रिल २०२६ ते २२ जून २०२६ या कालावधीत ३ लाख ६५ हजारांहून अधिक मालमत्ताधारकांनी जवळपास ४१२ कोटी ९७ लाख रुपयांचा मालमत्ता कर भरला असून, कर संकलनात सातत्याने वाढ होत आहे. महापालिकेच्या १८ क्षेत्रीय कार्यालयांपैकी वाकड विभागाने सर्वाधिक ५६.३९ कोटी मालमत्ता कर संकलित केला आहे. तसेच, त्याखालोखाल थेरगाव विभागाने ३७.३६ कोटी, कस्पटे वस्ती विभागाने ३२.९१ कोटी, किवळे विभागाने ३०.३८ कोटी मालमत्ता कर संकलित केला आहे.

viara vcc
viara vcc

याचबरोबर मालमत्ता कराच्या सामान्य करावर विविध प्रकारच्या सवलतींचा लाभ घेण्यासाठी आता केवळ ८ दिवस शिल्लक राहिले आहेत. सवलतींची अंतिम मुदत ३० जून २०२६ असून नागरिकांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता त्वरित मालमत्ता कर भरून उपलब्ध सवलतींचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने केले आहे.

महापालिकेकडून आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी ऑनलाइन पद्धतीने मालमत्ता कर भरणाऱ्या मालमत्ताधारकांना सामान्य करावर १० टक्के सवलत देण्यात येत आहे. या सवलतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून दि. १ एप्रिल २०२६ ते २२ जून २०२६ या कालावधीत ३ लाखांहून अधिक मालमत्ताधारकांनी ऑनलाइन पद्धतीने मालमत्ता कर भरून १० टक्के सवलतीचा लाभ घेऊन ३५८ कोंटींचा ऑनलाईन भरणा केला आहे.

नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयांमधील मालमत्ता कर काउंटर शनिवार व रविवारदेखील सुरू ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना सुट्टीच्या दिवशीही आपल्या जवळच्या विभागीय कार्यालयात जाऊन मालमत्ता कर भरता येणार आहे.

क्षेत्रीय कार्यालयांनुसार वसुली
१. वाकड – ५६.३९ कोटी
२. थेरगाव – ३७.६६ कोटी
३. कस्पटे वस्ती – ३२.९१ कोटी
४. किवळे – ३०.३८ कोटी
५. चिखली – २९.८१ कोटी
६. चिंचवड – २७.६२ कोटी
७. भोसरी – २५.६८ कोटी
८. पिंपरी-वाघेरे – २५.४० कोटी
९. मनपा भवन – २४.०३ कोटी
१०. मोशी – २३.६६ कोटी

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"