फक्त मुद्द्याचं!

22nd June 2026
पिंपरी-चिंचवड

इंधन संरक्षण आणि खाद्यतेल बचत’ जनजागृती अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद!

इंधन संरक्षण आणि खाद्यतेल बचत’ जनजागृती अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद!

पिंपरी-चिंचवड भाजपा महिला मोर्चाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन
पिंपरी : देशाच्या शाश्वत विकासासाठी आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी नैसर्गिक संसाधनांची बचत करणे काळाची गरज आहे. याच उद्देशाने पिंपरी-चिंचवड शहरात ‘इंधन संरक्षण आणि खाद्यतेल बचत’ जनजागृती अभियान मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या मोहिमेच्या माध्यमातून नागरिकांना इंधन आणि खाद्यतेलाची बचत करून भविष्यातील संकटांपासून वाचण्याचे आवाहन करण्यात आले.

viara vcc
viara vcc

हा महत्त्वाचा उपक्रम भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. तसेच, भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे, आमदार महेशदादा लांडगे, आमदार शंकरभाऊ जगताप, आमदार उमाताई खापरे, आमदार अमित गोरखे आणि महिला मोर्चा अध्यक्षा सुजाताताई पालांडे यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.
या मोहिमेच्या नियोजनात सरचिटणीस मधुकर बच्चे यांच्यासह महिला पदाधिकाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली.

प्रामुख्याने महिला मोर्चा सरचिटणीस अनघा रुद्र, उपाध्यक्ष ऐश्वर्या बाबर, चिटणीस स्वाती देशमुख, उपाध्यक्ष संजना मराठे व जयश्री मकवाना यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच, मंडळ अध्यक्ष नीता कुशारे, स्वाती जाधव, जोशना कलाटे, किरण पाचपांडे, मनीषा कुलकर्णी, मीनाक्षी गायकवाड, वसुधा देशपांडे, सुप्रिया वझे, स्वाती पवार आणि नीता भालेराव यांनी घरोघरी जाऊन आणि विविध वस्त्यांमध्ये नागरिकांशी संवाद साधून या अभियानाचा संदेश पोहोचवला.

या उपक्रमाद्वारे सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवण्याचेही आवाहन केले गेले.. मुख्य मुख्यत्वे आहारातील तेलाचा योग्य वापर करून आरोग्याचे जतन आणि इंधनाची बचत कशी करता येईल, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. सामाजिक जबाबदारीचे भान राखत राबवलेल्या या जनजागृती मोहिमेचे शहरातील नागरिक आणि विविध स्तरातून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"