फक्त मुद्द्याचं!

15th June 2026
गुन्हेगारी

आरोपींकडे पाहिल्याच्या कारणावरून तरुणावर तलवारीने वार; तिघे अटकेत!

आरोपींकडे पाहिल्याच्या कारणावरून तरुणावर तलवारीने वार; तिघे अटकेत!

पिंपरी : ओळखीच्या अल्पवयीन तरुणाकडे व त्यांच्या बरोबर असलेल्या एका व्यक्तीकडे पाहिल्याच्या कारणावरून अल्पवयीन तरुणांनी व एका व्यक्तीने लोखंडी रॉडने व तलवारीने तरुणाच्या डोक्यावर, डाव्या कानावर, तोंडावर तसेच हातावर जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने वार करून जखमी केले. ही घटना शनिवार 13 जून रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास शिल्पा हॉटेल डीपी रोड पिंपळे निलख येथे घडली. याप्रकरणी तिघा आरोपींना अटक करण्यात आली आहे

viara vcc
viara vcc

. याबाबत संतोष जनार्दन बालवडकर (वय 47, रा. फ्लॅट नंबर 603, विंग ए-3, गंगा पनामा सोसायटी, पिंपळे निलख) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. ऋषिकेश पाटील (वय 25), अभिषेक भासके (वय 18) जय शिंदे (वय 18) व इतर दोन अल्पवयीन तरुण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी क्रमांक एक, दोन, तीन यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचा मुलगा कार्तिक हा सेल पेट्रोल पंप येथे त्यांचे तोंड ओळखीचे अल्पवयीन तरुण व त्यांचे सोबत असलेले ऋषिकेश पाटील यांच्याकडे पाहिल्याच्या कारणावरून अल्पवयीन तरुणांनी हातातील रॉडने आणि आरोपी जय शिंदे यांनी त्याच्याकडील तलवारीने कार्तिकच्या डोक्यात, डाव्या कानावर, तोंडावर तसेच हातावर जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने वार करून जखमी केले. फिर्यादी यांचा भाचा अनिश शरद मुरकुटे हा ही भांडणे सोडवीत असताना त्यांचे ओळखीचे अभिषेक भासके यांनी व जय शिंदे यांनी त्यांच्याकडील तलवारीने (उलट्या बाजूने) त्याच्या उजव्या गालावर, ओठावर वार करून जखमी केले. आज तुला सोडणार नाही असे म्हणून डाव्या खांद्यावर रॉड मारून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर भांडणे करणारी अल्पवयीन मुले यांनी आम्ही येथील भाई आहोत, आमच्या नादाला लागाल तर असेच हाल करू असे म्हणून हातातील तलवारी रॉड हवेत फिरवत दहशत निर्माण केली. सांगवी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भालेराव हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"