फक्त मुद्द्याचं!

12th June 2026
पिंपरी-चिंचवड

चिमुकल्याची ‘सोशल मीडिया’वर साद अन्‌ आमदारांचा विश्वासाचा प्रतिसाद!

चिमुकल्याची ‘सोशल मीडिया’वर साद अन्‌ आमदारांचा विश्वासाचा प्रतिसाद!

‘व्हायरल व्हीडिओ’नंतर रस्त्याच्या कामाला तात्काळ सुरूवात
पिंपरी : भोसरी विधानसभा मतदार संघातील ओम साई कॉलनी, मोरे वस्ती येथील नवीन रस्ता प्रस्तावित आहे. कच्चा रस्ता असल्यामुळे स्थानिक नागरिकांची गैरसोय होत होती. याबाबत एका चिमुकल्याने सोशल मीडियावर व्हीडिओ प्रसारित केला. त्याची दखल घेत भारतीय जनता पार्टीचे आमदार महेश लांडगे यांनी प्रशासनाला सूचना केली आणि आमदार निधीतून रस्त्याच्या कामाचे भूमिपूजनसुद्धा करण्यात आले.

viara vcc
viara vcc

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत समाविष्ट गावांमध्ये विकास आराखड्यातील प्रमुख रस्त्यांची कामांना गती देण्यात आली. पायाभूत सोयी-सुविधा सक्षम करण्याचा अजेंडा राबवण्यात आला. त्यामुळे चिखली-मोशी-चऱ्होली रेसिडेन्सिअल कॉरिडॉर निर्माण झाला आहे. मात्र, काही वाडी-वस्तींवर आजही अंतर्गत रस्त्यांची कामे प्रलंबित आहेत. नवीन ग्रहप्रकल्प मोठ्या प्रमाणात विकसित होत आहेत. त्यांना ‘कनेक्टिव्हीटी’च्या दृष्टीने अंतर्गत रस्त्यांची कामे मार्गी लावण्याबाबत प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा केला जात आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर सुरज राहूल राऊत या मुलाचा व्हीडिओ व्हायरल झाला. त्यामध्ये सदर मुलगा ज्याला महेशदादा म्हणजे या विभागाचा आमदार आहे, याची माहिती आहे आणि त्याला कोणीतरी विचारले की, महेशदादाने काय केले पाहिजे? तर तो अगदी विश्वासाने सांगतो, ‘‘माझ्या गल्लीतील रस्ता डांबरीकरण केला पाहिजे’’ विशेष म्हणजे, ‘‘त्याला माझ्यावर विश्वास इतका की सांगतो, पावळ्यापूर्वी रस्ता झाला पाहिजे. ’’ असा व्हीडिओ व्हायरल झाला. यावर आमदार लांडगे यांच्या सहकाऱ्यांनी हा व्हीडिओ त्यांच्या निदर्शनास आणून दिला.

यावर, संबंधित चिमुकल्याचा विश्वास जपण्यासाठी आमदारांनी तातडीने प्रशासनाला सूचना दिल्या आणि प्रत्यक्ष रस्त्याच्या कामाला सुरूवात केली. विशेष म्हणजे, हा माझा चिमुकला सहकारी रस्त्याच्या भूमिपूजनालाही हजर होता. त्याच्याशी आमदारांचा संवादही झाला. ‘‘रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर भेट द्या, असे तो हक्काने सांगतो आहे..’’ असा आपुलकीचा संवाद उपस्थितांना भारावून सोडणारा होता, असे सामाजिक कार्यकर्ते व जय भवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष जितेंद्र यादव यांनी सांगितले.यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजोग मोरे, अविनाश सिंग, भूपेंद्र जाधव यांच्यासह सोसायटीधारक व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"