फक्त मुद्द्याचं!

10th June 2026
गुन्हेगारी

कुदळवाडी येथे कारवाई करण्यासाठी जाणाऱ्या पोलीस पथकावर दगडफेक ;36 जणांना अटक

कुदळवाडी येथे कारवाई करण्यासाठी जाणाऱ्या पोलीस पथकावर दगडफेक ;36 जणांना अटक

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने कुदळवाडी परिसरातील अनाधिकृत मंदिर, मज्जिद तसेच धार्मिक स्थळांवर कारवाई करण्यासाठी जात असताना 300 ते 500 लोकांचा बेकायदेशीर जमाव जमवून दगडफेक केली. यामध्ये बंदोबस्तामधील फिर्यादी व पोलिस अधिकारी, अंमलदार जखमी झाले. या प्रकरणी 36 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. ही घटना 9 जून रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास किंग काट्यासमोर ,नायरा पेट्रोल पंपाजवळ, सार्वजनिक रोडवर कुदळवाडी, चिखली येथे घडली.

viara vcc
viara vcc

याप्रकरणी राम गोविंदराव गोमारे (वय 36, सहाय्यक पोलीस निरीक्षक, चिखली पोलीस ठाणे )यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे .त्यानुसार नजीम नईम चौधरी (वय 26), एजाज वकार चौधरी (वय 26) यांना यापूर्वी अटक केली असून त्यांना 11 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

तर मोहम्मद उस्मान हुसेन इंद्रेशी (वय 26), अब्दुल रहमान सरवर आली इंद्रेशी (वय 26), आजम फक्रुद्दीन रज्जाक (वय 19), मोहम्मद आसिफ हबीवूर रहमान इंद्रीशी (वय 18), नसरुद्दीन अब्दुल हमीद सिद्दिकी (वय 20), रफिक शकील शेख (वय 35), शाही आलम अफजल सिद्दिकी (वय 24), साहिल अन्सारी शेख (वय 30), गुलाम हुसेन मैनुलाहा खान (वय 19), निजाम हुसेन नायब हुसेन सिद्दिकी (वय 22), अब्दुल करीम अली मुल्ला चौधरी (वय 35), रामदेव परमात्मा प्रताप पांडे (वय 48), फैजल नियाल चौधरी (वय 26), युसूफ खुशीत आलम चौधरी (वय 23), अकदस बरकत अली खान (वय 18), अब्बू सोफिया चौधरी (वय 32), नशीम अहमद इंद्रेशी (वय 19), मोहम्मद नवाज मोहम्मद अली खान (वय 34) कयायुबुद्दीन शिराजुद्दीन चौधरी (वय 22), मोहम्मद काशीम मेहम मेहफूज अलम चौधरी (वय 24), भैय्याज फतेखान (वय 28), मकसूद मंजूर चौधरी (वय 21), मेहफूज मंजूर चौधरी (वय 26), आकाश रामविलास सूर्यवंशी (वय 21), मेहफुज मंजूर चौधरी (वय 26), जुनेद मज्जित बेग (वय 20), मुराद मजीद बेग (वय 34), आरिफ वासउली इंद्रेशी (वय 38), अभिनंदन नीरज कुमार यादव (वय 18), वासू तांबोळी (वय 44) ,शादाब नौशाद मोमीन (वय 30) शाबाद मोहम्मद सय्यद (वय 31) आणि तीन अल्पवयीन बालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
आज दहा जून रोजी सकाळी 34 जणांना अटक करून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दगडफेक करणाऱ्यांनी बंदोबस्तामधील फिर्यादी पोलीस अधिकारी व अंमलदार यांना जखमी करून सरकारी वाहन क्रमांक (एम एच 12, वी सी/ 8148 )तसेच इतर वाहनांचे नुकसान करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करण्यात आल्याने कारवाई करण्यात आली. चिखली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुन्हे फडतरे हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"