संघटित गुन्हेगारीचे उच्चाटन करण्यासाठी पाच गुन्हेगारी टोळ्यांवर मोका अंतर्गत कारवाई!

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय
पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने 2026 मध्ये 27 संघटित गुन्हेगारी टोळ्यांमधील दीडशे आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई केली आहे. मे 2026 मध्ये पाच गुन्ह्यातील एकूण 45 गुन्हेगारांवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, पुणे शहर पोलीस आयुक्तालय, अहिल्यानगर हद्दीत खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा ,अमली पदार्थ जवळ बाळगणे ,जबरी चोरी, गंभीर दुखापत, खंडणीसाठी अपहरण, गैर कायद्याची मंडळी जमवणे, बेकायदेशीर घातक शस्त्र बाळगणे, दरोड्याची तयारी करणे, अग्निशस्त्रे व जिवघेणी हत्यार बाळगणे ,लोकांमध्ये दहशत निर्माण करणे, फसवणूक करणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, सार्वजनिक व खाजगी मालमत्तेची तोडफोड , जाळपोळ करणे, पुरावा नष्ट करणे अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे चढत्या क्रमाने गुन्हे केले आहेत. प्रत्येक गुन्हा करताना त्यांनी वैयक्तिक व टोळीचे वर्चस्व वाढावे आणि आर्थिक फायदा व्हावा, जनमानसात दहशत राहावी याच उद्देशाने टोळी प्रमुखांनी गुन्हे केलेले आहेत.
देहूरोड पोलीस ठाणे- आफताप समीर शेख (वय 24), रेहान रियाज तांबोळी शेख (वय 19), सिद्दिकी सलीम शेख (वय 25), मोहम्मद अली शकील शेख (वय 19), अरमान हुसेन शेख (वय 22), मोहम्मद सिद्दीकी अत्तार रहमान शेख (वय 29), नौशाद नजीर शेख (वय 25), सदर टोळी प्रमुख व त्यांचे साथीदार यांच्यावर एकूण बारा गंभीर गुन्हे केल्याची नोंद आढळून आलेली आहे.
देहूरोड पोलीस ठाणे- साबीर समीर शेख (वय 23, टोळीप्रमुख), निखिल उर्फ लखन बाळू आगळे (वय 27), आरमान हुसेन शेख (वय 21), नौशाद नजीर शेख (वय 26) मोहम्मद सिद्धकी आताउर रहमान (वय 30), अन्वर उमर शेख (वय 26), संदीप बाबू तेलंगू (वय 20), अहमद उर्फ टिल्या समशेर खान मोकाशी (वय 25), रितेश पुनाजी जाधव (वय 24), आफताब समीर शेख (वय 24), साई प्रेम शिवा चित्तामला (वय 22), शाहीद जावेद शेख (वय 33), मदन वेरण स्वामी (वय 40), ओंकार उर्फ ओमकार दीपक चौगुले (वय 24), अम्रीन अहमद शेख अमरीन रियाज आलम (वय 24), पप्पी सिंग ,आश्रम शेख पानीवाला, बाबू तेलगू ,सोनू शेख, मतीन सय्यद, शाहरुख शेख सदर टोळी प्रमुख व त्यांचे साथीदारांवर एकूण 19 गंभीर गुन्हे केल्याची नोंद आढळून आलेली आहे.
काळेवाडी पोलीस ठाणे –विकी शंभुलिंग सुतार (वय 32, टोळीप्रमुख), अभिषेक नरसिंग मांडगुळे (वय 26), बाबुराव सोमलिंग पाटील (वय 29), महेश जयसिंग गिरासे (वय 28) सदर टोळी प्रमुख व त्याचे साथीदार यांच्यावर एकूण आठ गंभीर गुन्हे केल्याची नोंद आढळून आलेली आहे.
उत्तर महाळुंगे पोलीस ठाणे -सागर बाळू जावळे (वय 34, टोळीप्रमुख), नितीन संजय थिटे (वय 27), सौरव उर्फ सोन्या अनिल ढोरे (वय 28), कुणाल प्रशांत चव्हाण (वय 23), अजय भरत गोपाळे (वय 23), ओमकार दशरथ कोरडे (वय 24), ओमकार काळूराम चव्हाण (वय 17 अल्पवयीन) सदर टोळी प्रमुख व त्यांचे साथीदार यांच्यावर एकूण सात गंभीर गुन्हे केल्याची नोंद आढळून आली आहे.
चिखली पोलीस ठाणे –अंबादास उर्फ सोन्या राजू राठोड (वय 24, टोळीप्रमुख) अफजल हाबूबुल्ला शहा (वय 22), मोहम्मद सिद्दिकी उर्फ मोहम्मद लालू चौधरी (वय 26), ओमकार गौतम (पाहिजे आरोपी), विशाल उर्फ बंटी बुधराम गौतम (वय 19 ),अरुण उर्फ शिवा राम सुरत गौतम (वय १६) सदर टोळी प्रमुख व त्यांचे साथीदार यांच्यावर एकूण तीन गंभीर गुन्हे केल्याची नोंद आढळून आलेली आहे.
महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 1999 चे कलमानुसार वरील 27 गुन्ह्यांपैकी बारा गुन्ह्यात अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे सारंग आवड यांनी तसेच 15 गुन्ह्यात अप्पर पोलीस आयुक्त प्रादेशिक विभाग बसवराज तेली यांनी आदेश पारित केले आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे (देहूरोड पोलीस स्टेशन), वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट (काळेवाडी पोलीस स्टेशन), वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी (उत्तर महाळुंगे पोलीस स्टेशन), वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे (चिखली पोलीस स्टेशन), वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती रूपाली बोबडे (पीसीबी गुन्हे शाखा), पोलीस निरीक्षक संजय चव्हाण (मालमत्ता विरोधी पथक गुन्हे शाखा), पोलीस निरीक्षक संदीप सावंत (युनिट चार, गुन्हे शाखा), सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पठारे (अप्पर पोलीस आयुक्त कार्यालय प्रादेशिक विभाग) यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

